कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी डॉ.रघुनाथ कुचिक

पुणे : भारतीय कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी शिवसेनेचे पुण्यातील शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक यांची फेरनिवड करण्यात आली. 

      डॉ. कुचिक हे शिवसेना व कामगार संघटनेचे सन १९९७ पासून पदाधिकारी आहेत. त्यांनी कामगार सेना महाराष्ट्रभर तसेच गोवा दिल्ली राज्यात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम पोहचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन मुंबईत झालेल्या भारतीय कामगार सेना सर्वसाधारण सभेत त्यांची या पदावर फेरनिवड करण्यात आली.

      शिवसेना व संघटनेच्या माध्यमातून संघटित, असंघटित कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मागीलप्रमाणे पुढेही अधिक जोमाने कार्यरत राहणार असल्याचे डॉ. कुचिक यांनी या निवडीनंतर सांगितले.