औद्योगिक संबंध संहिता, २०२० (Industrial Relations Code, 2020) बाबत ऑनलाईन सेमिनार संपन्न

पुणे : नवीन कामगार कायद्यामधील बदल होत आहेत, याबाबत कामगार, कामगार प्रतिनिधी यांच्या मध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने कामगार नामा ट्रस्ट यांच्या माध्यमातून औद्योगिक संबंध संहिता, २०२० (Industrial Relations Code, 2020) कोड मधील तरतुदी यांच्या बद्दल शनिवार दि. २५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.०० वा.यावेळेत ऑनलाईन सेमिनार संपन्न झाला. 

या सेमिनार करिता मार्गदर्शन श्री.धनराज शिवाजीराव जाधव (Retired Regional Labour Commissioner Central) यांनी मार्गदर्शन केले.

या ऑनलाईन सेमिनार मधील खालील विषय घेण्यात आले होते -

  • कामगार कपातीचे नियम (Retrenchment rules)
  • निश्चित-मुदतीचा रोजगार (Fixed-term employment)
  • संपाचे नवीन नियम (Strike notice rules)
  • तक्रार निवारण समिती (Grievance Redressal Committee)
  • कोड मधील महत्त्वाच्या तरतुदी
  • या कोड विषयी प्रश्नोत्तरे घेण्यात आली.

    या सेमिनार करिता पुणे, नाशिक, संभाजीनगर, मुंबई, नागपूर या भागातून कामगार, कामगार प्रतिनिधी, HR यांनी भाग घेतला. सेमिनार संपन्न होत असताना कामगार नामा तर्फे श्री.धनराज शिवाजीराव जाधव यांचे आभार मानण्यात आले.