दी न्यू क्लब (पूना) लिमिटेड येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : दी न्यू क्लब (पूना) लिमिटेड, २ राजेंद्र सिंहजी रोड, पुणे ४११००१ व्यवस्थापन आणि पुणे मजदूर संघटना यांच्या मध्ये  दि.२८/०३/२०२६ रोजी वेतनवाढ करार संपन्न झाला.

कराराची ठळक वैशिष्ट्ये : 

करार कालावधी : करार कालावधी तीन वर्ष राहील (दि.०१/०१/२०२६ ते ३१/१२/२०२८)

पगारवाढ : प्रत्येक कामगारास त्याच्या एकूण पगाराच्या ८% इतकी पगार दर वर्षी असे तीन वर्षापर्यंत मिळेल. साधारणतः: प्रत्येक कामगाराचा पगार सरासरी रु.२५,०००/- रुपयांपर्यंत आहे. म्हणजेच प्रत्येक कामगारास पहिल्या वर्षी रु.२०००/- , दुसऱ्या वर्षी रु.२१६०/- , तिसऱ्यावर्षी रु.२३३२/- इतकी पगार वाढ होणार आहे. म्हणजेच तीन वर्षाकरिता रु.६४५०/- इतकी पगारवाढ होणार आहे.

प्रत्येक कामगारास बिन व्याजी रु.१ लाख रुपये अपघाती कारणांसाठी, मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज मिळणार आहे.

प्रत्येक कामगारास ८.३३% बोनस व्यतिरिक्त रु.६०००/- सानुग्रह अनुदान बोनस सोबत मिळणार आहे.

      या करारवर व्यवस्थापनातर्फे अजितसिंग राजपाल (अध्यक्ष), संजय अगरवाल (उपाध्यक्ष), राजू मुरजानी (सेक्रेटरी), सुरेंद्र राठी आणि प्रकाश सातपुते यांनी तर पुणे मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी रामचंद्र बी शरमाळे, खजिनदार रणजित चव्हाण युनिट अध्यक्ष रमणकुमार वी, युनिट सेक्रेटरी विनोद जाधव यांनी सह्या केल्या. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.