पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे येथील Jiangyin Uni-Pol Vacuum Casting India Pvt. Ltd. या कंपनीच्या व्यवस्थापनाने 16 मार्च 2026 पासून कारखान्याचे कामकाज स्थगित करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत अन्यायकारक असून कामगारांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे.
व्यवस्थापनाने “जागतिक युद्ध परिस्थिती व लॉजिस्टिक अडचणी” या कारणांचा दाखला देत बहुसंख्य विभागातील कामगारांना कामावरून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात काही विभागांमध्ये काम सुरू ठेवून इतर कामगारांना Leave Without Pay वर टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या निर्णयाचा Uni-Pol India Kamgar Sanghatna व श्रमिक एकता महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
* सर्व कामगारांचा रोजगार व वेतन तातडीने सुरक्षित करावे.
* उत्पादन बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
* कामगारांना वेतनाशिवाय घरी बसवण्याचा निर्णय रद्द करावा.
* संघटनेशी तातडीने चर्चा करून योग्य तोडगा काढावा.
संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर कामगारांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा देत तीव्र आंदोलन छेडले जाईल.
प्रशासन व कामगार विभागाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
