छत्रपती संभाजीनगर : वाळूज औद्योगिक वसाहतीमधील ताइयो कागाकु इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Taiyo Kagaku India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि छत्रपती संभाजीनगर सीटू मजदूर युनियन यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
या करारातील प्रमुख ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे -
करार कालावधी : दि.1 एप्रिल 2025 पासून तीन वर्षे
पगारवाढ : रु.16000/-, या करारातील मागील पूर्ण फरक देण्याचे उभय पक्षाने मान्य केले आहे.
बदलता महागाई भत्ता : शासनाचा बदलता महागाई भत्ता कामगारांना नियमाप्रमाणे मिळणार आहे.
बोनस : प्रतिवर्षी दिवाळी बोनस म्हणून 36 हजार रुपये पर्यंत कामगारांना मिळणार आहे.
ॲक्सीडेंट पॉलिसी : कामगारांच्या ॲक्सीडेंट पॉलिसीमध्ये एकूण 5 लाखाची वाढ करण्यात आली आहे ,(ॲक्सीडेंट पॉलिसी एकूण पंधरा लाखापर्यंत असणार आहे )
सदरील मागणी करारात कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 18500 हजार पर्यंत सीटीसी पगारवाढ होणार आहे.
कॅन्टीन सुविधामधे नाश्ता वाढ करण्यात येणार आहे,तसेच मागील करारातील सर्व सुविधा पुढेही चालू ठेवण्यात येणार आहे.
कंपनी व्यवस्थापना तर्फे व्हाईस प्रेसिडेंट श्री.प्रवीण फिरके, एचआर जी एम श्री योगेश पिंगळे व सीटू युनियन तर्फे सीटूचे राज्य उपाध्यक्ष कॉ दामोदर मानकापे स्थानिक युनियन प्रतिनिधी कॉ आर.आर. पाटील, कॉ.तानाजी पाटील, कॉ.दावल अंडागळे, कॉ.निलेश दुबिले, कॉ. सुभाष भराट, कॉ.योगेश उकिरडे, कॉ.सुदाम मेत्रे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत कामगारांनी या कराराचे स्वागत करून मिठाई वाटप केले.

