दिव्यांगांना सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक मिळावी; एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर व रोहिणी आयोजित चर्चासत्रात मान्यवरांचे मत, तसेच कामगार नामा मॅगझीन चे प्रकाशन

पिंपरी - चिंचवड : महाराष्ट्र राज्य सरकारने २०१६ साली केलेल्या दिव्यांग कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी. दिव्यांगांसाठी भरीव कार्य करून त्यांना आस्थापनांमध्ये योग्य त्या कामासाठी सामावून घेणे गरजेचे आहे व त्यांना  त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्यास पुढाकार घ्यावा. दिव्यांगाना सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक  मिळावी. दिव्यांगांना समाजावरचे ओझे न समजता आपल्यात सामावून घेतले पाहिजेत.त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांना योग्य प्रकारे संधी उपलब्ध करून दिली पाहिजेत. कंपनी स्तरावर त्याचप्रमाणे राज्यस्तरावर व केंद्रस्तरावर प्रयत्न करून नोकरीमध्ये त्यांना आरक्षण देणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. असे मत केएसबी ग्रुपचे मानव संसाधन विभाग प्रमुख मोहन पाटील, झेड एफ ग्रुपच्या डी आय प्रमुख सुचित्रा बासू, सिगेंटा इंडियाचे दिलीप चौधरी, नॅशनल एचआरडी नेटवर्कच्या सचिव प्रतिभा हंबर्डे, यांनी व्यक्त केले.

     रोहिणी संस्थेच्या वतीने एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चॅप्टर, बजाज फिसर्व ,एनसीपीएडीपी आणि एनएचआरडी पुणे विभाग यांच्या सहकार्याने शनिवार, दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी कासारवाडी येथील कलासागर हॉटेल येथे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

    यावेळी दिल्ली येथील एनसीपीएडीपीचे संचालक अरमान अली, इनोसर्व कंपनीचे अध्यक्ष रामचंद्रन गोपालकृष्णन, पिं-चिं मनपा दिव्यांग भवन फाऊंडेशनचे परेश गांधी, रोहिणी संस्थेचे संचालक अक्षय सरोदे,  एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण शाखेचे अध्यक्ष प्रदिप मानेकर, सचिव नवनाथ सूर्यवंशी, उपाध्यक्ष अर्जुन माने, अतिरिक्त सचिव राहुल निंबाळकर, खजिनदार प्रीती पाटील, कार्यकारी सदस्य मधुकर सूर्यवंशी, अमित देशपांडे महेंद्र फणसे, अनू सेठी, निलेश नाफडे, संपत पारधी, दिग्विजय पिसाळ, अर्चना शेवकरी,सुनील गोसावी,संपत फडतरे, दत्तात्रय नखाते, सचिन लांडगे,स्विनी देशपांडे,प्रणव बेहरे, जयेश सुळे, दत्ता ठाणेकर, तसेच टाटा मोटर्सच्या सीएसआर विभागाचे रोहित सरोज, सक्षम भारत संस्थेचे अमोल कागवडे, बळीराम मुतगेकर, रमेश बागल, युवराज पवार, गणेश काळे, क्षितिज शिंपी, शरद कोळेकर,  आदी मान्यवर उपस्थित होते.

     यावेळी झालेल्या चर्चासत्रात वरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज कंपन्यांचे मूल्यमापन फक्त त्यांच्या नफ्यावर होत नाही,तर त्यांच्या उद्दिष्टांवर, मूल्यांवर आणि लोककेंद्री कामकाज पद्धतींवर होते.सर्व समावेशक कार्यबल निर्माण करणे ही आता केवळ सीएसआर कृती राहिलेली नाही; तर ती एक धोरणात्मक आणि RPwD कायद्यानुसार गरज आहे असे मनोगत प्रदिप मानेकर यांनी वक्त केले.

    अक्षय सरोदे म्हणाले कि, आपण सर्वांनी दिव्यांगाचे आवाज बनले पाहिजेत. संस्था किंवा व्यक्तींनी "तू दिव्यांग आहे" हे मनात ठासून भरवले आहे, ही मानसिकता बदलली पाहिजेत. दिव्यांगाना सामान्य नागरिकांसारखी वागणूक दिली पाहिजेत.

    या कार्यक्रमला 200 पेक्षा अधिक विविध बहुराष्ट्रीय कंपनीतील एचआर प्रतिनिधींची उपस्थित होते. यावेळी नवनाथ सूर्यवंशी यांनी बोलताना उपस्थित एच आर विभागात कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधींना एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे सदस्यत्व स्वीकारण्याचे आव्हान केले व लवकरच एन आय पी एम पुणे चाप्टर यांच्या सहयोगाने आयोजित नव्याने लागू करण्यात येणाऱ्या लेबर कोडस या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

    यावेळी कामगारनामा चे संस्थापक भूषण कडेकर यांच्या कामगार नामा या द्विमासिक मॅगझीनचे अनावरण हे एनआयपीएम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. एनआयपीएम चे सर्व मेम्बर्स यांनी कामगार नामा मॅगझीनचे बुकिंग करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.