पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र चाकण व सीआय इंडिया ऑटोमॅटिक लिमिटेड भोसरी युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवा निमित्ताने "भव्य रक्तदान शिबीर" आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्लॅन्ट हेड श्री.निवृत्ती बच्छाव साहेब, मनुष्यबळ विभागप्रमुख श्री.बाळासाहेब पाटील साहेब, श्री.दत्तात्रय पडवळ साहेब, श्री.प्रशांत शर्मा साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबीरामध्ये १३३ कामगारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. एकूण १५१ कामगार वर्गाने सहभाग नोंदवला. पुणे-हडपर रक्तपेढीचे तज्ञ डाॅक्टर स्नेहल गिरमकर यांनी रक्तदानाचे महत्व कामगार वर्गाला सांगितले. तसेच हिमोग्लोबीनची कमतरता या बाबतही मार्गदर्शन केले सीआयई इंडीया सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास एक स्मार्ट वाॅच व प्रमाणपत्र तसेच ट्राॅफी देण्यात आली.
श्री.अविनाश राऊत केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र चाकण यांनी कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त कामगार वर्गाने घ्यावा असे आवाहन केले.युनियन प्रतिनिधी श्री.दत्तात्रय धावडे, श्री.सुभाष जमादार, श्री.ज्ञानेश्वर कळमकर, श्री.दिपक अरगडे व श्री.कृष्णदेव थोरात यांनी या शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम व मोलाचे सहकार्य लाभले. कामगार कल्याण मंडळाच्या वतीने श्री. अविनाश राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.