पुणे : कामगार क्षेत्रातील शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योग–शिक्षण सहकार्याला नवी दिशा मिळाली आहे. NIPM पिंपरी चिंचवड–चाकण शाखा यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने ग्रामतरंग टेक्निकल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग प्रा. लि. (GTVET) यांच्या माध्यमातून Apprenticeship Embedded Degree/Diploma Program (AEDP) चा भव्य शुभारंभ आणि ऐतिहासिक करार स्वाक्षरी समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सेन्ट्युरियन युनिव्हर्सिटी आणि Board of Apprenticeship Training (BOAT) – वेस्टर्न रीजन, मुंबई यांच्यासोबत ऐतिहासिक करार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन NIPM पिंपरी चिंचवड–चाकण शाखा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवर आणि मनुष्यबळ विभागात कार्यरत असणारे प्रतिनिधी यांना एकत्र आणण्यामध्ये चाप्टरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. श्री. रमेश रासकर (Associate Director, GTVET) यांनी स्वागतपर भाषण केले.
औपचारिक करार स्वाक्षरी आणि कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. वैभव भौरसाकर (Operations Director, Lernern – Gram Tarang), श्री. एन. एन. वडोदे (Deputy Director, BOAT – वेस्टर्न रीजन, मुंबई), आणि श्री. अभिनव मदान (Co-Founder, MD & CEO, Lernern c/o GTVET) यांच्या हस्ते पार पडले.
समारंभात खालील मान्यवरांनी आपले विचार मांडले:
श्री. बसवराज बकली – Cluster Head, Exide Industries Ltd.
श्री. विश्वस भोंग – Strategic IR/ER/HR लीडर, Sigma Electric Manufacturing Pvt. Ltd.
सौ. प्रीती वर्मा – General Manager, Polybond India Pvt. Ltd.
या कार्यक्रमाला चाकण, तळेगाव, शिक्रापूर, रांजणगाव व शिरवळ औद्योगिक क्षेत्रातील 200 हून अधिक कंपन्यांचे HR प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. एन. एन. वडोदे यांनी सांगितले की सध्या NATS अंतर्गत 2,70,000 विद्यार्थी नोंदणीकृत असून AEDP मार्फत कोणत्याही कोटा बंधनांशिवाय 50,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी थेट आर्थिक मदत (DBT) दिली जाणार आहे.
श्री. अभिनव मदान यांनी कमवा व शिका या योजनेचा देशभरातील सहकार्याचा उल्लेख करत सांगितले की 12 राज्यांमध्ये 25,000+ विद्यार्थी, 450+ कंपन्या आणि 250+ महाविद्यालये यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे.
श्री. रमेश रासकर यांनी उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या सहकार्यामुळे स्थिर आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होण्याचा लाभ अधोरेखित केला. याशिवाय कर्मचारी पलायन कमी होणे, कायदेशीर पालन सुनिश्चित करणे आणि CSR निधीचा प्रभावी उपयोग यावरही त्यांनी भर दिला.
समारंभाचा समारोप एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे नवनियुक्त सेक्रेटरी श्री. नावनाथ सूर्यवंशी यांनी आभार प्रदर्शन करून केला. त्यांनी सांगितले की NIPM पिंपरी चिंचवड–चाकण शाखाच्या नेतृत्वाखाली झालेला हा ऐतिहासिक करार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि नोकरी या दोन्ही संधी मिळवून देणारा आहे. उद्योग–शिक्षण क्षेत्रातील समन्वय वाढवण्यास आणि कामगार कौशल्य विकासाला नवी दिशा देण्यास हा कार्यक्रम मोठे योगदान ठरणार आहे तसेच एच आर विभागात कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधींना एन आय पी एम पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे सदस्य होण्याकरता आव्हान केले. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर चे कार्यकारी पदाधिकारी प्रीती पाटील, अनु शेट्टी, राहुल निंबाळकर, निलेश नाफडे, अमित देशपांडे, दिग्विजय पिसाळ, प्रणव बेहरे यांच्यासह रोहित लामखडे, बंडू कुंभार, तुषार पवार, प्रीती साखरे व प्रिया भिवरे यांच्यासह विविध नामांकित आस्थापनामध्ये कार्यरत असणारे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.