नाशिक : लिअर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक येथे भारतीय कामगार सेनेचा ५८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय कामगार सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कामगार व वरिष्ठ व्यवस्थापनाच्या उपस्थितीत भारतीय कामगार सेनेच्या फलकाचे श्री तानाजी भाऊ फडोळ (भा.का.से सहचिटणीस) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
या दिनाचे अवचित साधून कामगार व कामगार प्रतिनिधी यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करून ९७ कामगारांनी रक्तदान करून गोरगरीब गरजूवंत लोकांसाठी मदत करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या मेट्रो रक्तपेढी सिविल हॉस्पिटल यांना देण्यात आल्या. त्यानिमित त्या ९७ कामगारांना रक्तपेढी कडून प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.