नवी मुंबई : दिघा येथील सुल्झर पंप्स इंडिया प्रा. लिमिटेड (Sulzer Pumps India Ltd) या बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईस युनियन हि अंतर्गत संघटना कार्यरत आहे. श्री रुपेश पवार हे साल २०२० पासून या संघटनेचे अध्यक्ष आहेत. २०२२ साली २८०००/- रुपयांचा त्रैवार्षिक पगारवाढीचा करार केल्यानंतर श्री. रुपेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व जनरल सेक्रेटरी श्री प्रमोद लोटणकर आणि त्यांच्या कमिटीने सुल्झर पंप्स इंडिया प्रा. ली. कंपनीच्या व्यवस्थापनेसोबत सोमवार दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी ऐतिहासिक त्रैवार्षिक वेतनवाढीचा करार केला.
या कराराचे वैशिष्ठे खालील प्रमाणे :
कराराचा कालावधी - १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२७ ( तीन वर्ष )
सन २०२५ - रु. ११०००/-
सन २०२६ - रु. ९५००/-
सन २०२७ - रु. ९०००/-
वेतन वाढीचे वाटप हे ५०% ( BASIC + FDA ) मध्ये व ५०% इतर भत्यांमध्ये या प्रकारे असेल.
पहिल्या दिवसापासून या पॉलिसीचा लाभ प्रत्येक कामगाराला मिळेल.
सेवा निवृत्ती नंतर सुद्धा हि पॉलिसी अखंड चालू राहील फक्त निवृत्ती नंतर त्याचा हफ्ता त्या कामगाराला भरावा लागेल.
दिवाळी भेट वस्तू : तीन वर्षासाठी भेट वस्तूची रक्कम हि रु. २६०००/- ठरविण्यात आली आहे. पण साल २०२६ व साल २०२७ करीता कंपनीच्या उत्पादन वाढीवर आधारित चर्चा करून ती रक्कम वाढविण्यात येईल.
सहल अनुदान : वेतन वाढी व्यतिरिक्त कंपनी प्रत्येक युनियन सभासदा प्रमाणे प्रत्येक वर्षी ६४००/- रुपये युनियन फंडात जमा करेल.
अ) फिक्स बोनस मध्ये प्रत्येक वर्षी रु. ३६००/- वाढ देण्यात येईल.
ब) बदलता बोनस कम एक्स ग्रेशिया (EBIT ) लिंक्ड हा कंपनीच्या अहवालानुसार व्याज आणि करांपूर्वीचे उत्पन्न विचारात घेऊन ते संबंधित वर्षाच्या नफा आणि तोटा खातेबंद घोषित केल्या प्रमाणे प्रत्येक वर्षी EBIT च्या १२% प्रमाणे वाटप केला जाईल.
प्रवास भत्ता ( LTA ) : प्रवास भत्यामध्ये प्रत्येक वर्षी रु. ३०००/- ची वाढ करण्यात येईल.
हा करार संपन्न झाला तेव्हा व्यवस्थापनेतर्फे कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री सुजल शहा, Country - HR श्री. मारुती नंदन, VP - Production Head श्री. जितेंद्र सावंत, HR ER श्री. सुनील चक्कनकर, कंपनी सेक्रेटरी, जनरल मॅनेजर सौ. अलका सिंग, HR - DGM श्री. संतोष सातोस्कर, HR IR श्री. सुयश जैस्वाल, सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईस युनियनचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार, उपाध्यक्ष श्री. मयूर उपाध्ये, जनरल सेक्रेटरी श्री. प्रमोद लोटणकर, खजिनदार श्री. माधव सकपाळ, सेक्रेटरी श्री. किसन भोर, उप सेक्रेटरी श्री. केतन कांगणे, कमिटी सभासद श्री. संतोष मांजरेकर, श्री. संजय भारती, श्री. सचिन थोरात हे पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर कामगारांनी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून आनंद साजरा केला. सर्व कामगारांनी युनियन कमिटीचे आणि व्यवस्थापनेचे आभार मानले.