शिरूर,पुणे : "कामगार नामा" याच्या माध्यमातून सन २०१९ पासून www.kamgarnama.com या ऑनलाईन पोर्टल माध्यमातून सर्व प्रकारच्या संघटित / असंघटित कामगार विषयी बातम्या, कामगार कायदे ओळख, विविध कंपनी मध्ये होणारे वेतनवाढ करार, विविध शासकीय योजना, PF, ESIC, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ योजना व विविध माहिती रोज प्रसिद्ध करून महाराष्ट्रातील लाखो कामगार यांच्या पर्यंत पोहचवली जाते.
सर्व प्रकारचे संघटित, असंघटित कामगार/ कर्मचारी सर्वांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी "कामगार नामा ट्रस्ट" या सामाजिक संस्थेची नोंदणी धर्मदाय कार्यालय,पुणे येथे करण्यात आली आहे.
या अंतर्गत गुरुवार,दिनांक १० जुलै २०२५ राजी "गुरुपौर्णिमा" निमित्ताने "भव्य रक्तदान शिबीर" स्थळ : श्री स्वामी समर्थ मंदिर, प्रीतम प्रकाश नगर, शिरूर ता. शिरूर, जि.पुणे येथे सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत आयोजित केले आहे.
या भव्य रक्तदान शिबीर सामाजिक उपक्रमास मध्ये सर्व प्रकारच्या संघटित / असंघटित कामगार यांनी रक्तदान करावे असे आवाहन कामगार नामा ट्रस्ट द्वारे करण्यात आले आहे.