वीज तांत्रिक कामगार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विलास कन्नाके पुरस्काराने सन्मानित

रुस्तम शेख कळंब तालुका प्रतिनिधी :- वीज तांत्रिक कामगार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष श्री विलास कन्नाके यांना पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके समागृहात  मान्यवरांच्या हस्ते प्रेस क्लब च्या वतीने एक्सलन्स अवार्ड २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले .

या प्रसंगी अभिनेत्री दिपाली सय्यद ,माजी खासदार रामसेठ ठाकुर ,प्रशांत शेडगे ,डॉ गणेश राख, विश्वनाथ साबळे  इ. मान्यवर उपस्थित होते . 

     विलास कन्नाके हे संघटनेच्या माध्यमातुन कामगाराचे अनेक समस्याचे  निवारण करीत असुन त्यांच्या हक्क आणि कल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन  यापूर्वी त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. विलास कन्नाके यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल रुस्तम शेख ,श्याम वेरूळकर व  मित्र परिवार इ अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.