संरक्षित कामगार (Protected Employee / Workmen) याबद्दल माहिती

औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ मध्ये कामगार व कामगार प्रतिनिधी यांना संरक्षित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

संरक्षित कामगार (Protected Employee / Workmen) कोण :

  • ज्या आस्थापनेत रजिस्टर संघटना आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संरक्षित कामगार म्हणून मान्यता मिळते.

सरंक्षित कामगार (Protected Employee / Workmen) लाभ :

  • चालू असलेल्या सेवाशर्ती मध्ये कोणताही बदल व्यवस्थापन कामगार आयुक्त यांच्या लेखी परवानगीशिवाय करू शकत नाही.

  • परवानगी शिवाय बढती तसेच पदोन्नती करता येणार नाही.

  • कामगार आयुक्त कार्यालयाकडून परवानगी शिवाय कारवाई करण्यास मनाई आहे.

सरंक्षित कामगार (Protected Employee / Workmen) मान्यतेसाठीची पद्धत :

  • रजिस्टर संघटनेने दरवर्षी ३० सप्टेंबर च्या अगोदर संरक्षित कामगार यादी कंपनी व्यवस्थापनास सादर करणे बंधनकारक आहे.

  • संघटनेच्या वतीने संरक्षित कामगार यादी कंपनी व्यवस्थापनाला दिलेल्या तारखेपासून पंधरा दिवसात कंपनीने मान्यता देणे आवश्यक आहे.

  • कंपनी व्यवस्थापनाने १५ दिवसात मान्यता न दिल्यास कामगार उपायुक्त कार्यालयात समेटासाठी अर्ज करावा.

  • अर्ज केल्यानंतर कामगार उपायुक्त व्यवस्थापना सोबत बैठक घेऊन मान्यता देतात.

संरक्षित कामगार (Protected Employee / Workmen) : बद्दल कायदा काय सांगतो, त्यामधील तरतुदी, मान्यता व सर्व माहिती - व्हिडिओ पहा (क्लिक करा)