श्रमयोगी पुरस्काराने कामगार नेते यशवंतभाऊ भोसले सन्मानित

पुणे : सातारा चेंबर्स ऑफ कॉमर्स, पुण्यातील श्रमिक, कामगार आणि उद्योजक यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रम महर्षी तर कामगार क्षेत्रातील ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेबद्दल यशवंतभाऊ भोसले यांना श्रमयोगी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते यशवंतभाऊ यांना हा पुरस्कार देण्यात आला.

    यशवंतभाऊ भोसले हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असून कामगार चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. गेली ३० वर्षे ते कामगारांच्या न्याय हक्कासाठी झगडत आहेत. पिंपरी -चिंचवड एमआयडीसीत त्यांचे मोठे वलय आहे. कामगार नेते म्हणून त्यांच्या योगदानाची दखल घेवून त्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव शिंदे-पाटील होते. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे सभासद उपस्थित होते. संयोजक पत्रकार अरुण कांबळे यांनी संस्थेचा उद्देश सांगितला. संचालक विजय सोनावले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गणेश दरेकर, राजेंद्र खेडेकर, स्वानंद राजपाठक, रामराजे भोसले, जयदेव अक्कलकोटे, दिनेश पाटील यावेळी उपस्थित होते.