पुणे : महाराष्ट्र शासनाच्या वतीने किमान वेतन सल्लागार समिती घोषित केली असून सदर समितीवर कामगार प्रतिनिधी म्हणून श्री. बाळासाहेब तुकाराम भुजबळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ माध्यमातून शिरवळ, शिरूर, मावळ, रायगड जिल्ह्यातील संघटित, असंघटित क्षेत्रात श्री. बाळासाहेब तुकाराम भुजबळ हे गेली 27 वर्षापासून संघाच्या वतीने काम करीत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील पुणे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणच्या कंपन्यांमध्ये कामगारांचे वेतनवाढ करार , कामगारांवर होणारे अन्यायाला वाचा फोडण्या करिती आंदोलन त्यांनी केलेले असून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, विविध हॉस्पिटल तसेच विविध कॉलेज, व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत.
असंघटित क्षेत्रातील हंगामी फवारणी कर्मचारी या संघटनेचे ते प्रदेश अध्यक्ष म्हणून सध्या ते कार्यरत असून भारतीय मजदूर संघाच्या विविध जबाबदारी त्यांनी सांभाळलेल्या असून सध्या ते भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
असंघटित क्षेत्रातील तसेच विविध उद्योगात काम करणाऱ्या कायम, कंत्राटी/रोजंदारी अथवा डेली वेजेस वर काम करणाऱ्या लाखो कामगारांचे वेतन निश्चित करण्यासाठी शासनाची किमान वेतन सल्लागार समितीवर काम करणार असून तसेच वीज उद्योगातील, मेट्रो उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र वेतनश्रेणी करिता शोषित पीडीत व वंचित कामगारांना चांगल्या प्रकारे जीवनमान जगता यावे याकरिता त्यांना चांगले किमान वेतन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती श्री. बाळासाहेब भुजबळ यांनी दिली.
या वेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व पुणे भारतीय मजदूर संघ अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सचिव सागर पवार यांनी अभिनंदन प्रस्ताव पारित करण्यात येवुन सर्व सामान्य कामगारांपर्यंत किमान वेतन च नाही तर जीवन वेतन मिळवे अशी अपेक्षाच अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे . शासनाने व भारतीय मजदूर संघाने या मंडळावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल श्री. बाळासाहेब भुजबळ यांनी उभयंताचे आभार मानले.