सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील कॅप्रिहंस इंडिया लिमिटेड (Caprihans India Limited) (बिलकेअर रिसर्च) आणि भारतीय कामगार सेना यामध्ये वेतन करार झाला. यानुसार कामगारांना २१ हजार रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली आहे. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक आणि व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची ठरली असे वृत्त सकाळ वृत्तसंस्थेने दिले आहे.
हा वेतनवाढीचा करार चार वर्षासाठी लागू असून या करारामुळे कामगारांच्या पगारात २०२५ ते २०२९ या कालावधीत सरासरी एकवीस हजार रुपयांची सीटीसी वाढली झाली. याव्यतिरिक्त वार्षिक बोनस तसेच मेडिक्लेम, प्रॉडक्शन इन्सेन्टिव्ह, मृत्यू साहाय्य निधी आदी सुविधा कामगारांना मिळणार आहे. या ऐतिहासिक करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
हा वेतन करार मागील कालावधी संपल्यानंतर केवळ दहा दिवसाच्या आत खेळीमेळीच्या वातावरणात झाला. हा वेतन करार म्हणजे नाशिक च्या औद्योगिक क्षेत्रातील ऐतिहासिक घटना मानली जात आहे. या करारावर भारतीय कामगार सेनेकडून शिवसेना नेते अरविंद सावंत, चिटणीस प्रकाश नाईक यांनी तर कंपनीकडून प्रकल्प हेड अंकुश शितोळे, एच. आर. व्यवस्थापक सचिन ब्राह्मणकर तसेच युनिट कमिटीकडून युनिट अध्यक्ष सुनील धावडेकर, सरचिटणीस कैलास बुह-हाडे, कृष्णमोहन शुक्ला, राजाराम केदार आणि सुभाष वाघचौरे यांनी सह्या केल्या.