“कापड रंगविण्याचा आणि/ किंवा कापडावर छपाई करण्याचा उद्योगातील कामधंदा " रोजगारात कामगारांचा किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याची अधिसूचना मसुदा प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्यातील “कापड रंगविण्याचा आणि/ किंवा कापडावर छपाई करण्याचा उद्योगातील कामधंदा " अनुसूचित उद्योग नंबर ०५ रोजगारात कामांवर असलेेल्या कामगारांंना देय असलेले किमान वेतन दर पुुनर्निधारित करण्याबाबतचा प्रस्ताव अंंतर्भूूत असलेली जी अधिसूचना काढण्याचे प्रस्ताावित केलेले आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

    त्याद्वारे अशी सूूचना देण्यात आली आहे की, महाराष्ट्र शासन राजपत्रात सदरहूून अधिसूूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यानंंतर महाराष्ट्र शासन उक्त मसुदा विचारात घेतला जाईल.

    उक्त मसुद्याच्याा संबंधांत उपरोक्त कालावधी संपण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तींकडून जे कोणतेहीे अभिवेदन कामगार आयुुक्त, कामगार भवन, ई ब्लॉक, सी-२०, बांंद्रा-कुर्ला संकुंल, बांद्रा (पूू.), मुंंबई ४०० ०५१ यांंचेकडून येेईल ते शासनाकडून विचारात घेेण्यात येेईल.

उद्योगातील किमान वेतन दर वेळेवर पुनर्निर्धारित न केल्यामुळे कामगारांचे होते आर्थिक नुकसान -

    “कापड रंगविण्याचा आणि/ किंवा कापडावर छपाई करण्याचा उद्योगातील कामधंदा " अनुसूचित उद्योग नंबर ५  हया अनुसूचित उद्योगातील कामगारांचे मागील किमान वेतन हे (revised) २२ जुलै २०१० साली झालेले होते. किमान वेतन अधिनियम प्रमाणे हया अनुसूचित उद्योगातील कामगारांचे किमान वेतन दर ५ वर्षांनी Revised व्हायला हवं होतं, तसं न होता आता शासनाने चक्क जवळपास १५ वर्षांनंतर कालावधी उलटल्यानंतर आता revised करण्या‌ संबंधीचा मसुदा जाहिर केलेला आहे. साधारणपणे अजुन २-३ महिन्यांचा कालावधी हया संपुर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी लागेल.

      किमान वेतन दर ५ वर्षांनी पुनर्निर्धारित होत नसल्यामुळे लाखो कामगारांचे आर्थिक नुकसान होते, याचा विचार शासनाने केला पाहिजे.

“कापड रंगविण्याचा आणि/ किंवा कापडावर छपाई करण्याचा उद्योगातील कामधंदा" अनुसूचित उद्योग नंबर ५ किमान वेतन दर पुनर्निर्धारित करण्याचा अधिसूचना मसुदा पाहण्यासाठी - क्लिक करा