पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथील ३ए कंपोजिट्स इंडिया प्रा. लिमिटेड (3A Composites India Pvt Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि ३ए कंपोजिट्स कामगार संघटना यांच्यामध्ये तिसरा वेतनवाढ करार 4 मार्च 2025 रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा माहे १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.
मागील दोन करारमधील डीए लॉक केला होता,तो डीए यावेळेस व्हेरिबल करण्यात आला.आणि शासनाच्या GR प्रमाणे दर सहा महिन्याला वाढीव देण्याचे मान्य केले.
१) प्रथम वर्षासाठी रक्कम - रु. ६६००/-
२) द्वितीय वर्षासाठी रक्कम - रु.४,५००/-
३) तृतीय वर्षासाठी रक्कम - रु.३,९००/-
फरकाची रक्कम : 100% फरकाची रक्कम देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
दिवाळी भेटवस्तू : एक चांगल्या पद्धतीची भेटवस्तू देण्यात येईल .
पहिले वर्ष - रु.३०,०००/-
दुसरे वर्ष - रु.३०,०००/-
तिसरे वर्ष - रु.३०,०००/-
रु.१५००/- रुपये किमतीचे ड्रायफूटस प्रत्येक दिवाळीला देण्यात येईल.
पे हॉलिडे : पे हॉलिडे मध्ये एक ने वाढ करण्यात आली. (एकुण = १०)
ब्लॉक क्लोजर : ब्लॉक क्लोजर मध्ये मर्यादा आणण्यात आलेली नाही, ब्लॉक क्लोजर नंतर 100% पगार मिळणार आहे.
नाईट शिफ्ट अलाउन्स : नाईट शिफ्ट आलाउन्स सुरू करण्यात आलेला आहे. (रु.५०/- प्रती दिन. )
पगार ॲडव्हान्स : रु.५०,०००/- पगार ऍडव्हान्स चालू करण्यात आले
निवडणूक सुट्टी : विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी जीआर प्रमाणे सुट्टी देण्याचे मान्य झाले आहे.
सेवा बक्षीस : सर्व कामगारांना सेवा बक्षीस नव्याने चालू करण्यात आले आहे.
रजा : पितृत्व लिव्ह 5.
पावसाळी रेनकोट : प्रत्येक वर्षाला एक पावसाळी रेनकोट देण्याचे मान्य करण्यात आलेले आहे.
मागील करारा पैकी वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी रु.२ लाख होती. नवीन रु.१० लाख चालू करण्यात आली आहे. (स्वतः कामगार,पत्नी, २ मुले नव्याने ऍड करण्यात आले.)
नव्याने मरणोत्तर विमा धोरण : रु.१० लाख करण्याचे मान्य केले आहे.
काही कामगार कंपनीच्या बसचा वापर करत नाही,त्यांच्यासाठी पेट्रोल अलाउन्स ही नवीन सुविधा चालू आली.
नव्याने दरवर्षी फॅमिली डे आयोजित करण्याचं मान्य केले.
मागील सेवा सुविधा जसेच्या तसे पुढे सुरू राहणार आहेत.
करारावरती व्यवस्थापनाच्या वतीने. श्री. रणजीत शर्मा सर (CEO), श्री. प्रशांत पात्रो सर (A.V.P & Plant Head ), श्री.महेश राठोड (MANAGER HR.) तसेच अध्यक्ष श्री गणेश धुमाळ, जनरल सेक्रेटरी श्री प्रवीण रासकर, उपाध्यक्ष श्री संकेत थिटे, खजिनदार श्री. संदीप धुमाळ, सह.सेक्रेटरी श्री अशोक देशमुख, कार्यकारीणी श्री. उत्तम यादव, सह.कार्यकारीणी श्री. योगराज पाटील यांनी सह्या केल्या.
सदर करार यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री. किशोर ढोकले, श्री. अविनाश वाडेकर, श्री. राजू अण्णा दरेकर, श्री. गणेश जाधव तसेच संघाचे प्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. सल्लागार श्री. रामचंद्र शरमाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ ज.सेक्रेटरी श्री. अविनाश वाडेकर यांचे विशेष आभार यांनी ३ए कंपोजिटस् कामगार संघटनेला ग्रॉसच्या OT संदर्भात पत्र देऊन खूप मोलाचे सहकार्य केले. (आणि इथून मागील OT सगळा फरक देण्याचे मान्य केले.)
सदर वेतनवाढ करार हा ३ए कंपोजिट्स कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघहितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता,सुरक्षा, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे करार यशस्वीरित्या पूर्ण झाला अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.