नाशिक : अंबड एमआयडीसीतील किम्प्लेस पाईपिंग सिस्टिम्स प्रा लिमिटेड (Kimplas Piping Systems Pvt Ltd) या कंपनीत भारतीय कामगार सेना प्रणित युनियन पदाधिकारी व कंपनी यांच्यात दिनांक १०/५/२०२५ रोजी वेतन करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या.
या करारानुसार सर्व कामगारांना चार वर्षांसाठी रुपये १४,४९२/- वेतनवाढ मिळणार असून, त्याचबरोबर शासनाच्या परिपत्रकानुसार महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच मेडिक्लेम इन्शुरन्स कुटूंबासाठी तीन लाख रुपये करण्यात आला आहे. कामगारांना दरवर्षी ११% इतका बोनस मिळणार आहे. त्याचबरोबर पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस, वर्ष सेवा केलेल्या कामगारांना सर्विस इनक्रेमेन्ट, रेनकोट, वार्षिक सहल, वार्षिक रजा प्रवास भत्ता, कामगारांच्या पाल्यसाठी शिष्यवृत्ती इत्यादी लाभ मिळणार आहे.
पगार वाढ व इतर लाभाच्या करारावर कंपनी व्यवस्थपणाच्या वतीने श्री.राजेंद्र धागे प्लांट हेड, श्री. सचिन सुरेश सोनावणे हेड एच.आर.आणि आय. आर. , श्री.राजेश शिरसाठ सहायक जनरल मॅनेजर व युनियनच्या वतीने खासदार श्री. अरविंद सावंत अध्यक्ष भारतीय कामगार सेना, प्रकाश नाईक सरचिटणीस, तानाजी फडोळ, प्रवीण निकम, निलेश कहांडळ, मनोज निकम, राकेश शेवाळे, जगदीश पाटील यांनी सह्या केल्या. यावेळी कामगारांनी एकमेकांना पेढे भरवून कंपनी व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले.