इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन कार्यकारिणी त्रैवार्षिक २०२५ निवडणूक संपन्न

बारामती : इमसोफर मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉईज युनियन कार्यकारिणीच्या त्रैवार्षिक २०२५ निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला जबरदस्त धक्का बसला. झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष मा.बाळासाहेब शामराव डेरे यांच्या नेतृत्वाखाली फेरेरो कामगार एकता पॅनेलने ११ जागांपैकी १० जागांवर भरघोस मतांनी विजय संपादन केला. बाळासाहेब डेरे यांनी कामगारांना आपली बाजु पटवून देत पॅनलची भक्कम बांधणी केली. त्यामुळे मतदारांनी फेरेरो कामगार एकता पॅनेलच्या बाजूने कौल दिला.

विजयी उमेदवार. सचिन गवळी  शितल शेंडे , महेश काटे , महादेव गोसावी , ज्योती अडागळे , महेश लकडे , पोर्णिमा भोसले , संदिपकुमार बिचकुले , सचिन भगत , बाळासाहेब डेरे . 

    संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब डेरे यांनी सर्व निवडणूक प्रक्रिया शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या बद्द्ल सर्व उमेदवार, कार्यकर्ते, कामगार बंधू-भगिनी तसेच कंपनी व्यवस्थापन यांचे आभार मानले. 

युनियनच्या कमिटीची निवड खालील प्रमाणे करण्यात आली -
१) श्री. बाळासाहेब डेरे ( अध्यक्ष )
२) सौ. पोर्णिमा भोसले ( उपाध्यक्ष )
३) श्री. महेश लकडे ( सचिव )
४) श्री. सचिन गवळी ( कार्याध्यक्ष )
५) श्री. सचिन भगत ( खजिनदार )
६) श्री. संदीपकुमार बिचकुले ( सहसचिव )
७) सौ. ज्योती अडागळे ( सहखजिनदार )
८) सौ. शितल शेंडे ( सदस्या )
९) श्री. महेश काटे ( सदस्य )
१०) श्री. महादेव गोसावी ( सदस्य )
११) श्री. मनोज भोसले ( सल्लगार )