औद्योगिक सुरक्षिततेचे कामगारांना धडे कामगारांची कार्यशाळा संपन्न

भंडारा : गेल्या महिन्यात  जवाहरनगर आयुध निर्माणीमध्ये झालेल्या दुदैवी घटनेनंतर औदयोगीक  व कामगार सुरक्षेबाबत प्रशासनाने पाऊल उचलले. या जिल्हा प्रशासन व औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा नियोजन सभागृह येथे कामगार  सुरक्षा विषयक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कामगारांना कारखान्यात किंवा संबंधीत कार्यस्थळी होणाऱ्या अपघातांदरम्यान करावयाच्या उपाययोजनांबाबत जाणीव जागृती करण्याच्या उददेशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते असे वृत्त विदर्भ न्यूज एक्सप्रेस वृत्तसंस्थेने दिले आहे.

     या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अप्पर पोलिस अधिक्षक, इश्वर कातकडे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सह संचालक सचिन चौधरी, कामगार विभागाचे सहायक आयुक्त, राजदीप धुर्वे उपस्थित होते.

     कारखान्यातील कामगारांची सुरक्षा कल्याण व आरोग्य हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. म्हणूनच कामाचे ठिकाणी होणारे संभाव्य अपघात व संभाव्य आरोग्याचे धोके विचारात घेऊन ते समाधानकारकरित्या कमी करणे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने  हा प्रयत्न असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले.

     कामगारांच्या जीवीताची सुरक्षा ही प्राथमिकता असली पाहीजे. याबाबत कामगारांनी हजेरीपटावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच सुरक्षा कीटचा योग्य वापर, संकटकालीन निर्गतीचे मार्ग याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक इश्वर कातकडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन औद्योगिक विभागाचे पल्लवी गंमपावार, तर आभार प्रदर्शन अभिषेक नामदास यांनी केले.

औद्योगिक सुरक्षेत -
- कारखान्यांचे निरीक्षण करणे. 
- कारखान्यातील अपघातांची चौकशी करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविणे.
- तक्रारींची चौकशी करणे व त्यांचे निराकरण करणे. 

व्यावसायीक आरोग्य -
- उप संचालक (आरोग्य)/प्रमाणक शल्यचिकित्सक यांचे मार्फत कारखान्यांतील कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे. 
- कामाचे ठिकाणाच्या वातावरणाचे निरिक्षण, आरोग्यविषयक सर्वेक्षणे जसे की, ध्वनीची तीव्रता, वायुविजन, हवेतील प्रदूषण इत्यादी तपासणी करणे. 
- वयाची पडताळणी, कारखाने अधिनियमांतर्गत अल्पवयीन व्यक्तीची वैद्यकीय तपासणी व प्रमाणपत्र देणे
- धोकादायक प्रक्रियामध्ये काम करणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी करणे. 
- प्रमाणक शल्यचिकीत्सकांची प्राधिकृती देणे.  
- प्रथमोपचार प्रशिक्षण संस्थाना मान्यता देणे. 

आदींबाबीना औदयोगिक आस्थापनांनी प्राधान्य दयावे, असे या कार्यशाळेदरम्यान सांगण्यात आले. जिल्हयात कार्यरत औदयेागिक आस्थापनांचे प्रतीनीधी, कामगार, तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.