पुणे : नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंट (NIPM ) पुणे विभाग यांच्या झालेल्या निवडणुकीत NIPM पुणे विभागाचे अध्यक्ष श्री कल्याण पवार यांची मोठ्या मताधिक्याने फेर निवड झाली. श्री कल्याण पवार यांना एकूण ५१८ पैकी ३४१ मतदान मिळाले. यावेळी झालेल्या निवड बद्दल NIPM पुणे विभाग यांच्या वतीने अध्यक्ष श्री कल्याण पवार यांचे अभिनंदन सर्वांच्या वतीने करण्यात आले.
विशेष म्हणजे NIPM पुणे ही भारतामधील एक अग्रगण्य अशी शाखा असून सर्व नामांकित कंपन्याचे HR अधिकारी या शाखेचे सदस्य आहेत. मोठ्या प्रमाणात महिला सुधा या शाखेच्या सदस्य आहेत. या शाखेची कार्य क्षेत्र हे फक्त पुणे सिटी नसून बारामती, रांजणगाव, इंदापूर, कुरकुम, तळेगाव,चाकण, शिक्रापूर, पिंपरी चिंचवड,भोसरी इत्यादी आहे.
ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती आणि या मध्ये सर्व सदस्यांनी श्री कल्याण पवार यांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी निवडून दिले आहे . ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडली आणि त्यासाठी वरिष्ठ वकील श्री आर एम निर्मल यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले आणि महत्वाची भूमिका बजावली.
NIPM हि संस्था संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास २५ हजार मनुष्यबळ विकास प्रतिनिधी असणारी एकमेव संस्था आहे, तिची स्थापना १५ मार्च १९८० रोजी कलकत्ता येथे झाली असून नॅशनल इन्स्टिटयूट लेबर मॅनेजमेंट आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ पेर्सोनेल मॅनेजमेंट याचा उत्तम मिलाफ आहे. पुणे शहरामध्ये NIPM पुणे विभाग कार्यरत आहे.
या वेळी बोलताना श्री कल्याण पवार यांनी सांगीतले की पुढील काळात पुणे चॅप्टरला आणखी उंचीवर नेण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतील . तसेच या वेळी त्यांनी सर्व सदस्याचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती केली.