मुंबई : शिवसेना पक्षप्रतोद आ. सुनिल प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालय मुंबई येथे राज्यातील गुणवंत कामगारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेवून असोसिएशनच्या वतीने सादर केलेल्या लेखी मागणीपत्रावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला क्रिडा, संघटना व आस्थापना तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी अविरतपणे कार्य करीत असलेल्या नोंदणीकृत कामगारांना, शासनाच्या कामगार विभागामार्फत गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देवून गौरविले जाते. अशा महाराष्ट्रातील (36 जिल्हे) प्रमुख गुणवंत कामगारांनी एकत्र येवून, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेची केली आहे. हि समाजभिमुख कार्यासाठी चांगली व कौतुकास्पद बाब आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्यावतीने ज्या सामाजिक कार्यकत्यांना राज्य स्तरावरील पुरस्कार दिले जातात, त्यांना त्या विभागाच्यावतीने शासनाच्या विविध सोई सवलती मिळतात. त्याच धर्तीवर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांना विशेष सोई सवलती देण्यासाठी मागणीपत्रावर सकारात्मक कार्यवाही करू, असे स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना यावेळी भेटीच्या शिष्टमंडळामध्ये राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय संघटनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष तथा मंत्रालयीन प्रतिनिधी रफिक मुलाणी, शिवसेना उपशाखा प्रमुख दत्तात्रय शिरोडकर यांचा समावेश होता.
यावेळी उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री यांना देखील लेखी निवेदने दिली असल्याचे शिष्टमंडळाच्यावतीने सांगणेत आले. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या दालनामध्ये उपस्थित अनेक मंत्री तसेच आमदार महोदयांशी देखील राज्यातील गुणवंत कामगारांच्या मागणीपत्राच्या अनुषगाने चर्चा करण्यात आल्या. त्यांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सदर भेट घडवून आणण्यामध्ये मंत्रालयीन प्रतिनिधी रफिक मुलाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.