पुणे विभाग अप्पर कामगार आयुक्त पदी श्री.अभय गिते यांची नियुक्ती

पुणे : पुणे विभागाच्या अप्पर कामगार आयुक्त पदी श्री.अभय गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या अभय गिते हे पुणे कामगार उपआयुक्त पदी कार्यरत होते. 

        श्री.अभय गिते हे मूळचे बीड चे आहेत. बीड येथे बारावीपर्यंतचे आणि औरंगाबाद येथे पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गिते यांनी बी.फार्मसी केले आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एमबीए (Human Resource) चा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर आठ वर्षे औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास विभागाचे काम पाहिले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभाग मध्ये सहाय्यक कामगार आयुक्त  म्हणून प्रथम औरंगाबाद व पुणे तसेच पुणे कामगार उपआयुक्त पदी  कार्यरत असताना त्यांची पुणे विभागाच्या अप्पर कामगार आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती.

      कामगार क्षेत्रामध्ये असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गिते यांची ओळख असून पूर्वी औद्योगिक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ विकास विभागामध्ये काम केल्यामुळे कामगारांच्या प्रश्नांची जाण असणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.