पुणे : सणसवाडी एमआयडीसी येथील फोसेको कंपनी (Foseco India Limited) कंपनी व्यवस्थापन आणि फोसेको एम्प्लॉईज युनियन (श्रमिक एकता महासंघ सलग्न) यांच्यामध्ये वेतनवाढ करार संपन्न झाला.
मागील करार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात आला व दिनांक ३ डिसेंबर २०२४ पासून नवीन करार करण्याबाबत फोसेको व्यवस्थापना सोबत वाटाघाटी बाबत अर्थपूर्ण चर्चा चालू झाल्या. या वाटाघाटी चर्चेमध्ये फोसेको कंपनीची व्यावसायिक स्थिती, तसेच आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट ला बाजारपेठे मधील स्थान अधिक मजबूत कसे करता येईल या दृष्टीने व्यवस्थापन व युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा करार अंतिम स्वरूपात करण्यात यश प्राप्त झाले. यातून निश्चितच कंपनीची आणि कामगारांची खूप भरभराट होईल. ह्या कराराची बोलणी अवघ्या ७५ दिवसांमध्ये पूर्ण झाली आहे.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
करार कालावधी : सदर करार हा दि.1 जानेवारी 2025 ते दि.31 डिसेंबर 2027 या तीन वर्षाकरिता झालेला आहे.
पहिल्या वर्षाकरिता :- रुपये 12,000/-
रजा : PL encashment करणे हि पद्धत Global policy नुसार बंद करण्यात आली आहे, कामगाराला वर्षाला 30 PL घेणे बंधनकारक राहील.
उत्पादन क्षमतेमध्ये कुठलीही वाढ न देता हा करार यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
हा करार संपूर्ण यशस्वी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनातर्फे श्री. प्रसाद चावरे (VP India & ASEAN, Foundry), डॉ. उज्जल भट्टाचार्य (HR Director India & ASEAN), श्री दलजीत बंगा (Operations Director Foundry India & ASEAN Operations), श्री महेश वैद्य (Manager - HR & IR), श्री अनुप शर्मा (Manager - HR & IR Senior HR Business Partner), श्री सारंग देशपांडे (Plant manager), श्री विशाल आहेर (Plant manager) तसेच फोसेको एम्प्लॉईज युनियन कडून श्री मोहन हरगुडे - अध्यक्ष, श्री शिवाजी गायकवाड - जनरल सेक्रेटरी, श्री रुपेश कोळेकर - खजिनदार, श्री योगेश नाणेकर - उपाध्यक्ष, श्री प्रेमजीत माने - जॉइंट सेक्रेटरी, श्री भरत मात्रे- कमिटी सदस्य, श्री संकेत जाधव- कमिटी सदस्य उपस्थित होते.
हा करार यशस्वी करण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार श्री मारुतीराव जगदाळे, श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष श्री किशोर सूर्यवंशी आणि श्रमिक एकता महासंघाचे जनरल सेक्रेटरी श्री रोहित पवार यांचे करार चालू झाल्यापासून ते अंतिम होईपर्यंत विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या रणनीती आणि व्यवस्थापनासोबत तेवढीच सामंजस्याने केलेली चर्चा या सर्व गोष्टींचा समतोल ठेवण्यात आला तसेच फोसेको इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या सर्व सभासदांनी जो संयम ठेवला व युनियन कमिटीवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व सभासदांचे मनापासून आभार अशी माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली.