पुणे (कामगार नामा) : शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सक्षम भारतच्या वतीने ‘राष्ट्र उभारणीत उद्योग आणि मानव संसाधनाची भूमिका’ या विषयावर एक दिवसीय शिखर परिषद - २०२५ चे आयोजन हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल, वाकड, पुणे येथे करण्यात आले आहे. सकाळी ७:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत ही परिषद पार पडणार आहे.
ही परिषद उद्योग व्यावसायिक, मानव संसाधन क्षेत्रातील तज्ज्ञ व धोरणकर्त्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. वाढत्या जागतिक स्पर्धा, करोना महामारीनंतरच्या उद्योग क्षेत्रातील आव्हाने, व्यवस्थापन, मनुष्यबळ विकास आणि ‘सक्षम भारत’ उभारण्यासाठी HR ची धोरणात्मक भूमिका यावर मंथन होणार आहे तसेच नव्याने लागू करण्यात येणारे लेबर कोड याबाबत सविस्तर चर्चा होऊन व्यवस्थापन व कामगार क्षेत्रा समोरील विविध आव्हाने यावरती कामगार प्रतिनिधी व्यवस्थापन प्रतिनिधी व नामांकित कायदेतज्ञ त्याचप्रमाणे शासनाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल चर्चा करण्यात येणार आहे.
प्रमुख उपस्थित मान्यवर:
• मा. देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री, महाराष्ट्र
• मा. अजितदादा पवार – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
• मा. उदय सामंत – उद्योग मंत्री
• मा. आकाश फुंडकर – कामगार मंत्री
• मा. सचिन अहिर – कामगार नेते, MRRKS अध्यक्ष
• मा. भाई जगताप – आमदार व INTUC नेते
• श्रीमती मनीषा वर्मा (IAS) – प्रधान सचिव, कौशल्य विकास
• श्री. विनय कुमार चौबे (IPS) – पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
- श्री. अभय गीते, अप्पर कामगार आयुक्त पुणे
• तसेच मानव संसाधन व औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवर
- कायदेतज्ञ आदित्य जोशी व श्री एन जलोटा
परिषदेत चर्चेचे मुख्य विषय:
• उद्योग व मानव संसाधन यांची राष्ट्र उभारणीत भूमिका
• व्यवसायातील आव्हाने व उपाय
• जागतिक स्पर्धेत भारतीय उद्योग कसे सक्षम होतील?
• कामगार धोरणे आणि व्यवस्थापनातील सुधारणा
• कौशल्य विकास, नेतृत्व विकास व कामगार हक्क
- नव्याने येऊ येऊ घातलेले कामगार कायदे, बदल व विविध आव्हाने व लेबर कोड ची अंमलबजावणी.
- लेबर कोड अमलबजावणी दरम्यान कामगार संघटना प्रतिनिधी यांचे शासनाकडून व व्यवस्थापनाकडून असणारे अपेक्षा
ही परिषद उद्योग मालक, उद्योजक, HR तज्ज्ञ, व्यवस्थापक, शैक्षणिक तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांसाठी खुली आहे.
संयोजकांतर्फे अंदाजेत ४०० पेक्षा अधिक विविध नामांकित कंपनीतील एच आर प्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, येणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले त्याचप्रमाणे सक्षम भारत समूहातर्फे सर्व एच आर प्रतिनिधी, कायदेतज्ञ, कारखानदार वरिष्ठ पदाधिकारी व व्यवस्थापन विषयातील पदवी घेणारे विद्यार्थी यांना या चर्चे करता सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याकरता खाली नमूद केलेल्या लिंक वर इच्छुकांना नाव नोंदणी करण्याकरता विनंती करण्यात येत आहे
https://sakshampath.com/home/
नोंदणीसाठी संपर्क:
📞 प्रांजल: 9049017393 | मारुती पवार: 7843040915
📞 अमोल कागवाडे: 9576117111 | बळीराम मुटगेकर: 9922995624
📞 अजित देसवंडीकर: 9881719295
📱 विवेक पवार- 9404270799