फिनिक्स मेकॅनो इंडिया (Phoenix Mecano India Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : पिरंगुट औद्योगिक वसाहतीतील भरे तालुका (मुळशी) येथील फिनिक्स मेकॅनो इंडिया लिमिटेड या कंपनीत पगार वाढीचा करार झाला असून, यामधे भारतीय कामगार सेना युनियन च्या सभासदांना 2024 ते 2027 या तीन वर्षा करीता 17 हजार रुपये वेतन वाढ देण्यात आली आहे. 

     हा ६ वा वेतन वाढ करार शांततेत व यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना उपनेते,भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस तसेच किमान वेतन आयोगाचे मा. अध्यक्ष डॉ. रघुनाथजी कुचिक, भारतीय कामगार सेना कार्यकारणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश उमेशजी साळुंके, मुळशी तालुका संघटक संदेश सुर्वे, युनियन कमिटी अध्यक्ष भरे प्लांट धनंजय नागरे, उर्से (मावळ) प्लांट अध्यक्ष गणेश घोटकुले, उपाध्यक्ष राहुल ववले, सरचिटणीस नंदू देवरजीकर कमिटी सदस्य विजय जाधव, बाबासाहेब कांबळे, यांनी संघटनेच्या वतीने काम पाहिले आणि व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे व व्यवस्थापकिय संचालक - सौरभजी शुक्ला, व्हॉ प्रेसिडेंट- विजय जोशी, HR मॅनेजर - अंकिता जोशी, प्लॅनिंग मॅनेजर - अतुल देशपांडे, तसेच HR. उमेश बारवकर यांनी काम पाहिले. भारतीय कामगार सेना अध्यक्ष खासदार अरविंद सावंत कार्याध्यक्ष अजीत दादा साळवी यांनी करारावर स्वाक्षरी केली.

       फिनिक्स मेकॅनो कंपनीच्या व्यवस्थापनाचा सकारात्मक दृष्टीकोन, कामगारांवर असणारा विश्वासा मुळेच आणि डॉ. रघुनाथ कुचिक साहेबांच्या मोलाचे सहकार्य मुळे हा वेतन वाढ करार यशस्वी रित्या व शांततेच्या मार्गाने पूर्ण झाला. तसेच व्यवस्थापने 10 लाखाचे मेडिकल पॉलिसी 3 वर्ष साठी मंजूर केली.. ३२ कंत्राटी सेवा ज्येष्ठतेनुसार कंपनी करार कालावधित कायम केले जाणार आहेत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा मदतीचे  आश्वासन देण्यात आले, त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि हा करार पंचक्रोशीतील वेतन वाढीचा सर्वात मोठा करार यशस्वी केला आहे.