पुणे : HD Hyundai Construction Equipment India Pvt. Ltd आणि ह्युंडाई एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये वेतनवाढ बाबतचा करार झाला.मागील करार दिनांक 30 जून 2024 रोजी संपुष्टात आला व दिनांक 1 जुलै 2024 पासून नवीन करार करण्याबाबत ह्युंडाई व्यवस्थापना सोबत वाटाघाटी बाबत अर्थपूर्ण चर्चा चालू झाल्या.
या वाटाघाटी चर्चेमध्ये ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीची व्यावसायिक स्थिती, तसेच आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट ला बाजारपेठे मधील ह्युंडाईचे स्थान अधिक मजबूत कसे करता येईल या दृष्टीने व्यवस्थापन व युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा करार अंतिम स्वरूपात करण्यात यश प्राप्त झाले.यातून निश्चितच कंपनीची आणि कामगारांची खूप भरभराट होईल.
रविवार दिनांक 19/01/2025 रोजी याबाबत सर्वसाधारण सभा घेऊन झालेला करार कामगारांना पूर्ण समजावून त्या सभेमध्ये त्यांची मंजुरी घेण्यात आली . सभेमध्ये सर्व कामगारांनी टाळ्यांचा मोठा जल्लोष करत हा करार एकमताने मान्य केला. सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी अत्यंत आनंददायी आणि उत्साही वातावरणात वेतन करार स्वाक्षांकित करण्यात आला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :-
करार कालावधी : दि. 1 जुलै 2024 पासून दि. 30 जून 2028
* पहिल्या वर्षाकरिता :- 10,500 रुपये
* दुसऱ्या वर्षाकरिता :- 6,000 रुपये
* तिसऱ्या वर्षाकरिता :- 6,000 रुपये
* चौथ्या वर्षाकरिता :- 5,500 रुपये
दि.01/07/2024 रोजी पासून 100% फरक देण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले .
मंथली इन्सेंटिव्ह : किमान 4,500 रुपये ते 17,000 रुपये पर्यंतची तरतूद
वार्षिक इन्सेंटिव्ह : किमान 29,000 रुपये ते 52,500 रुपये पर्यंतची तरतूद करारामध्ये करण्यात आली आहे.
10 वर्ष सेवेसाठी :- 10,000 रुपये
15 वर्षे सेवेसाठी :- 15,000 रुपये
रजा साठवणूक मर्यादा : 175 दिवसापर्यंत साठवण्याची तरतूद करण्यात आली
रजेमध्ये वाढ : 1 EL (अर्ण लिव्ह) वाढवण्यात आली
युनियन ऑफिस देण्याची तरतूद व्यवस्थापनाने मान्य केली. त्यामध्ये गरजेच्या सेटअप सहित युनियन ऑफिस देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली.
उत्पादकता वाढ कामगार युनियन कडून देण्यात आली
हा करार संपूर्ण यशस्वी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनातर्फे Managing Director श्री.एस. शिम, Factory Manager श्री. बी. एच.चोई, Head -HR श्री मनीष फणसळकर, AGM -ER श्री. प्रकाश धोंडगे, Dy. Maneger - HR श्री. संग्राम कदमबांडे, AGM Production श्री.गौरव वशिष्ठ व असेंबली हेड श्री. आशिष आमले, इतर विभाग प्रमुख मध्ये श्री अभिजीत काळे ,श्री महादेव कोरे, श्री रवींद्र भंडारी, श्री प्रशांत येवले यांनी मदत केली तर ह्युंडाई एम्प्लॉईज युनियन कडून श्री सायबण्णा गोविंदे - अध्यक्ष, श्री रोहित पवार - जनरल सेक्रेटरी, श्री आश्विन गोरे - खजिनदार, श्री विजय गायकवाड - उपाध्यक्ष, श्री गणेश मिसाळ - उपाध्यक्ष, श्री राम केमसे - जॉइंट सेक्रेटरी, श्री सुरेश वऱ्हाडे - जॉइंट सेक्रेटरी यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.
ह्युंडाई एम्पलॉईज युनियनच्या सर्व सभासदांनी आजपर्यंत जो संयम ठेवला व युनियन कमिटीवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व सभासदांचे मनापासून आभार हा करार खऱ्या अर्थाने यशस्वी व ऐतिहासिक करण्यासाठी श्रमिक एकता महासंघाचे प्रमुख सल्लागार तसेच युनियन सल्लागार श्री मारुतीराव जगदाळे यांचे करार चालू झाल्यापासून ते अंतिम होईपर्यंत विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या लॉजिकल रणनीती आणि व्यवस्थापनासोबत तेवढीच सामंजस्याने केलेली चर्चा या सर्व गोष्टींचा समतोल ठेवण्यात आला अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
तसेच HD ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनीचे सल्लागार श्री रामचंद्र निर्मल साहेब यांनी या करारामध्ये युनियन आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये तांत्रिक स्वरूपात मदत केली असून त्यामध्ये युनियन आणि मॅनेजमेंट यांच्यातील रिलेशन मजबूत करून दिले त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार. श्रमिक एकता महासंघाच्या छत्रछायेखाली असल्यामुळे हा ऐतिहासिक टप्पा गाठण्यात युनियन यशस्वी होऊ शकली तसेच श्रमिक एकता महासंघाचे सर्व पदाधिकारी व इतर महासंघातील संलग्न संघटना व युनियन प्रतिनिधी या सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.