कोपलैंड इंडिया प्रा. लि.(Copeland India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

सातारा : सातारा जिल्हयामधील कोपलैंड इंडिया प्रा. लि.(Copeland India Pvt Ltd) अतित कंपनी व्यवस्थापन व इंजिनिअरिंग श्रमिक संघटना अतित यांच्यामध्ये आठवा वेतन करार, शांततामय, उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणात मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाला.

वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :-

कराराचा कालावधी : दि.18 जुन 2024 ते 17 एप्रिल 2028 (3 वर्षे 10 महिने)

वेतनवाढ : 20,000 रु
वेतनवाढ (तीन टप्यात) पुढील प्रमाणे :
पहिली वेतनवाढ - 18 महिने 71% रु. 14200/- 18 जून 2024 पासून लागू
दुसरी वेतनवाढ - 18 महिने 14%रु. 2800/- 18 डिसेंबर 2025 पासून लागू
तिसरी वेतनवाढ - 10 महिने 15% रु. 3000/- 18 जून 2027 पासून लागू

दि. 18 जुन 2024 ते 31 डिसेंबर 2024 या सहा महिने तेरा दिवसाचा फरक एकरकमी माहे जानेवारी 2025 च्या पगाराबरोबर देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

दिवाळी बोनस : उत्पादनाशी निगडीत बोनस करार न करता प्रचलित पद्धती नुसार 20% बोनस देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

रात्रपाळी भत्ता : सध्या मिळत असणारा रात्रपाळी भत्ता हा सी.टी. सी. चा भाग असल्याने तो बंद करून सदर सी. टी. सी. रक्कम सप्लीमेंन्ट्री अलाउन्समध्ये वर्ग करण्यात आली आहे.

वार्षिक उपस्थिती पुरस्कार :
1) 280 हजर दिवस - 3000 रु,
2) 281 ते २८३ हजर दिवस - 3500 रु
3) 284 हजर दिवस - 3800 रु
4) 285 हजर दिवस - 4000 रु

रजा : EL रजा एक वाढवून 22 ऐवजी 23 देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
(सदर मुद्दा सी.टी. सी. चा भाग असेल)
SL रजा या पुढे हाफ डे SL व EL सोबत जोडून घेता येईल.

बफर पॉलिसी :
बफर पॉलिसी प्रति वर्ष 10,00,000/- (दहा लाख) रूपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

कालबद्ध पदोन्नती :
ज्या कामगारांना दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना संध्या असणाऱ्या ग्रेडच्या पुढील ग्रेड देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

वार्षिक वेतन वाढ :
वार्षिक इनक्रिमेट मध्ये 50 रु वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. (सदर मुद्दा सी. टी. सी. या भाग असेल)

ट्रान्सपोर्ट :
1) सध्या असणाऱ्या ट्रान्सपोर्ट रूट मध्ये बदल करून मसूर व मल्हारपेठ रूट वाढविण्याचे मान्य करण्यात आले आहेत. (सदर मुद्दा कराराचा भाग नसेल)
२) जे कामगार बसचा वापर करत नाहित अशा कामगारांना 872 रु सप्लीमेंट्री अलाउन्स मध्ये वाढ देण्याचे मान्य केले आहे. (सदर मुद्दा सी. टी. सी. चा भाग असेल)

      यावेळी करारावरती संदीप गुप्ता (उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक), केतन देसाई (संचालक मानव संसाधन), दीपक भगत (संचालक संचालन व Mfg), आबासाहेब पाटील (हेड ऑपरेशन व फॅक्टरी मॅनेजर), विनय ब्रह्मे (सीनियर व्यवस्थापक IR आणि HR), प्रवीण मोरे (व्यवस्थापक आय. आर), शशिकांत शिर्के (व्यवस्थापक आय. आर) तसेच इंजिनिअरिंग श्रमिक संघटना अतीत यांचे वतीने राजेंद्र यादव (अध्यक्ष), विकास पवार (सरचिटणीस), कृष्णाथ देसाई (उपाध्यक्ष), विक्रमसिंह चव्हाण (सहसचिव), निवास पाटील (खजिनदार), आनंदराव संकपाळ (सदस्य), मच्छिंद्र शिवदास (सदस्य), महादेव तुपे (सदस्य), सागर देशमुख (सदस्य), महावीर पवार (सदस्य), युवराज जगताप (सदस्य), अधिकक रोकडे (सदस्य), प्रशांत रेळेकर (सदस्य) यांनी केल्या.

     सदर करार संपन्न होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन श्री. नितिन कुलकर्णी (प्रमुख सल्लागार), श्री. दिलीप यादव (अध्यक्ष क्रेन सातारा), श्री. किशोर ढोकले (राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, पुणे), प्रकाश शिंदे (विरगो ईमर्सन पुणे) तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

    व्यवस्थापनाची सामंजस्याची भुमिका आणि सकारात्मक दृष्टीकोन आणि संघटनेच्या सभासदांनी राखलेला संयम, अभेद्य एकजुट, केलेले मोलाचे सहकार्य, संघटना आणि संघटनेतील प्रतिनीधीवर ठेवलेला विश्वास यांच्या बळावर हा करार यशस्वीरित्या संपन्न झाला अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.