अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीत भीषण स्फोट

कुरकुंभ (ता. दौंड) : येथील एमआयडीसीमधील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. स्फोटात कंपनीतील कामगार गंभीर जखमी झाला आहे.सागर रणभावरे, असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.जखमी कामगारास उपचारासाठी दौंडमध्ये हलविण्यात आले होते. त्यानंतर त्याला दौंडहून पुण्याला हलविण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की सकाळच्या वेळी परिसरात मोठा आवाज झाला.

     अल्काईल अमाईन्स या कंपनीत सकाळी डिस्टिलेशन विभागात रिबॉयलरमधून रेसीड्यु ट्रान्सफर झाल्यानंतर टॅंक टी-४४२० ही 2000 लिटरची टाकी फुटून मोठा स्फोट झाला असल्याची माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी अंकुश खराडे यांनी दिली आहे.

     घटनास्थळी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे, सुरक्षा अधिकारी अंकुश खराडे, दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, कुरकुंभ पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी भेट दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.