ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सामूहिक कृतीसाठी कामगार संघटना प्रतिनिधिची संपन्न !

महाराष्ट्र भारतातील एकूण साखर उत्पादनाच्या 30 टक्के साखर उत्पादन करतो व भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा साखर उत्पादन करणारा देश आहे आणि अशा परिस्थितीत साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या ऊसतोडणी कामगारांना असे वाऱ्यावर सोडू नये अशी आमची ठाम भूमिका आहे. सद्यस्थितीतील ऊसतोड स्थलांतरीत कामगारांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कामगारांच्या शोषणाची स्थिती कायम राखण्यासाठी सहकारी साखर कारखाना संघ श्रमिक संघटनांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे. 

     भारत जागतिक पातळीवरील आर्थिक महासत्ता बनण्याच्या स्वप्नांचे आम्ही समर्थनच करतो परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा देशातील श्रमिक मजुरांना भारतीय संविधानाद्वारे प्रदान केलेल्या आर्थिक आणि सामाजिक अधिकारांची सुरक्षिततेची आणि मूलभूत रोजगारांची हमी मिळेल.

    वरील बाबी लक्षात घेऊन सहकारी साखर कारखाना संघ कारखाने स्वतःची जबाबदारी झटकून स्वतःच्या स्वार्थासाठी व आर्थिक लाभासाठी आमच्यावर व कामगारांचे मुलभूत हक्कावर करत असलेल्या हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी श्रमिक संघटना एका निकराच्या लढाईची सुरुवात करत आहे. ज्यात आपल्या सहकार्याची अपेक्षा आम्ही करत आहोत.यासाठी सर्व सहकारी कामगार संघटनांची एक ऑनलाईन बैठक सम्पन्न झाली यासंदर्भात काही ठोस रचनात्मक कार्य व उपाय योजना केल्या जातील व याबाबत विस्तृत चर्चा झाली .