- पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्याकडून कारवाईचा इशारा
पिंपरी-चिंचवड : एमआयडीसीतील कारखाने टिकविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी एमआयडीसी भयमुक्त करण्यास प्राधान्य आहे. स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थापनास त्रास देत असल्यास कडक कारवाई करण्यात येईल. कंपनी व्यवस्थापन, उद्योजकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे मंगळवारी (दि. ८) चाकण एमआयडीसीत वाहतूक समन्वय तसेच कंपनी व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त चौबे बोलत होते. वाहतूक विभाग, एमआयडीसी, आरटीओ, माथाडी बोर्ड, महसूल विभाग व पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. म्हाळुंगे एमआयडीसीतील कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यात आला.
श्री. विनयकुमार चौबे, मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, यांनी उपस्थित कंपनीचे प्रतिनिधी यांना संबोधीत करताना खालील नमुद मुद्यांवर मार्गदर्शन केले.
२. नागरीकांनी ११२ हा क्रमांक डायल केल्यानंतर अंदाजे पुढील ५ ते ६ मिनीटात त्यांना पोलीस मदत उपलब्ध होते. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींनी सदर सेवेंचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त प्रसार करावा.
३. औद्योगिक तक्रारीचे तात्काळ निवारण होणेकरीता पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणा-या खंडणी विरोधी पथकामध्ये औद्योगिक तक्रार निवारण कक्ष ( इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल) स्थापन केल्याची माहिती देण्यात येवुन, त्याव्दारे औद्योगिक परीसरातील समस्यांची त्वरीत सोडवणुक केली जाते.
४. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत एकुण ०६ गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्यांतर्गत एकुण- ३९ गुंडांवर कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत एकुण- ०५ गुंडांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे एकुण २६ गुंडांना पुणे जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आलेले आहे.
५. कोणतीही समस्या, दादागीरी, अडचण, तसेच माथाडी कामगारांच्या संबंधी काहीएक तक्रार असल्यास, समक्ष पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी, तसेच पोलीस आयुक्तालयामधील खंडणी विरोधी पथकांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या औद्योगिक तक्रार निवारण कक्ष ( इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल) येथे तक्रार केल्यास तात्काळ मदत मिळेल.
६. कंपनी व्यवस्थापनाने कंपनीच्या आतील भागाप्रमाणेच कंपनीच्या बाहेरील जागेमध्ये, सार्वजनिक रस्त्यावर चांगल्या दर्जाचे हाय डेफिनेशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करुन सदर कॅमेरे यांची साठवणूक क्षमता किमान ३० दिवसांची असावी अशी सुचना केली.
७. कंपनी व्यवस्थापनाने त्यांचे कामगारांचे मोटारसायकल व चारचाकी गाड्या ह्या कंपनीचे बाहेर रोडवर पार्किंग न करता, कंपनीचे गेटचे आत पार्किंगची सोय करावी, जेथे पार्किंग करणे शक्य नसल्यास तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेस सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा.
८. कंपनी व्यवस्थापनास काहीएक तक्रार असल्यास, त्यांनी पुढे येवुन तक्रार दिल्यास, पोलीस विभागाकडुन त्यांना तात्काळ मदत मिळुन, गुन्हेगारांवर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे सांगुन, महाळुंगे एमआयडीसीमध्ये भयमुक्त वातावरण ठेवण्याचा उद्देष असल्याचे सांगीतले. एमआयडीसी भागात असलेले कारखाने टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशी आहोत. यात कोणी स्थानिक गुंड, कामगार संघटना किंवा माथाडी कामगार विनाकारण कंपनी व्यवस्थपनास त्रास देत असल्यास, त्यांचेवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगीतले.