चाकण - निघोज येथील औद्योगिक वसाहत फेज क्रमांक ४ मधील महिंद्रा अँड महिंद्रा - इंजिन प्लांट कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कंपनी पटावरील सर्व कायमस्वरूपी असोसिएट्स यांना आर्थिक वर्ष २०२३-२४ करिता रुपये ६८,५००/- इतका भरघोस बोनस व सानुग्रह अनुदान रक्कम जाहीर करताच सर्व असोसिएट्स व त्यांचे कुटुंबीय यांनी आपला आनंद साजरा केला.
येऊ घातलेल्या दिवाळीनिमित्त बोनस मिळावा यासाठी कंपनी व्यवस्थापन व महिंद्रा इंजिन्स असोसिएट्स युनियन यांच्यामध्ये कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापक श्री. विनय खानोलकर साहेब - चीप मॅन्युफॅक्चरिंग ऑफिसर - ऑटो सेक्टर, श्री संग्रामसिंग देशमुख - व्हाईस प्रेसिडेंट- एम्पलोई रिलेशन्स (ऑटो सेक्टर ), श्री. संजय क्षीरसागर- इंजिन प्लांट्स हेड चाकण व इगतपुरी, तसेच श्री बबीत नायक जनरल मॅनेजर ईआर विभाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चर्चा झाल्या, यावेळी श्री संग्रामसिंग देशमुख व श्री संजय क्षीरसागर यांनी प्रामुख्याने संघटनेचे प्रतिनिधी यांच्याशी सविस्तर विचार विनिमय व वेळोवेळी सकारात्मक चर्चा करून कंपनीची ध्येय, धोरणे, कर्मचाऱ्यांच्याकडून असणारी अपेक्षा व त्यास संघटनेकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद व कारखान्यात असलेले सलोख्याचे वातावरण याबाबत समाधान व्यक्त केले व भविष्यात कंपनी व्यवस्थापन हे असोसिएट्स यांच्या पाठीशी असल्याचे सांगण्यात आले.
यादरम्यान संघटनेचे अध्यक्ष श्री अजय घाडगे, जनरल सेक्रेटरी श्री रविराज कदम, उपाध्यक्ष श्री आकाश गव्हाणे यांनी व इतर संघटनेचे सहकारी प्रतिनिधी यांनी मोलाची भूमिका बजावली आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे अध्यक्ष व इतर सर्व प्रतिनिधी यांनी संघटना व सर्व सभासद हे स्वतःची जबाबदारी ओळखून सदैव कंपनीच्या भरीव कामगिरी करता, उत्पादन वाढीकरता, सलोख्याचे वातावरण ठेवण्याकरता, तसेच कंपनी व्यवस्थापनास अपेक्षित असलेल्या प्रतिसाद व वरिष्ठ व्यवस्थापनाने ठरवून दिलेली ध्येयधोरणे साध्य करण्याकरता सदैव कटिबद्ध व एकजुटीने कार्यरत राहील आणि चाकण येथील इंजिन प्लांट हा भविष्यात स्वतःचे अस्तित्व हे चढत्या आलेखाप्रमाणे ठेवण्याकरिता प्रथम प्राधान्य देतील अशी एक मुखी ग्वाही सर्व प्रतिनिधींनी व्यवस्थापनास दिली त्याचप्रमाणे व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिवाळी बोनस हा वेळे अगोदर व चांगल्या रकमेचा दिल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त करून व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले.
या वेळोवेळी कंपनी व्यवस्थापनाचे इतर अधिकारी वृंद श्री अमोल देशपांडे- सीएफओ, ईआर विभागाचे श्री नवनाथ सूर्यवंशी व श्री नागेश जोशी यांनी श्री संग्रामसिंग देशमुख - व्हाईस प्रेसिडेंट- एम्पलोई रिलेशन्स व श्री संजय क्षीरसागर प्लांट हेड यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली व कारखान्यात हासी- खेळीच्या वातावरणात बोनस जाहीर करण्याकरता मोलाचा सहभाग नोंदविला. यादरम्यान व्यवस्थापनाच्या वतीने सर्व विभाग प्रमुख, श्री हेमंत चव्हाण, श्री गौरव दांडेकर, श्री के साई, डॉ. चंचल, श्री अमित पाटील व संघटनेचे इतर प्रतिनिधी श्री आशिष खुरपुढे श्री गोकुळ जाधव व बळीराम चव्हाण हे यात उपस्थित होते.