ब्रिटानिया इंडस्ट्रीयल एम्प्लॉईज युनियनच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त फलक अनावरण तसेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : रांजणगाव एमआयडीसी येथील ब्रिटानिया इंडस्ट्रीयल एम्प्लॉईज युनियनच्या द्वितीय वर्धापनदिना निमित्त ब्रिटानिया इंडस्ट्रीयल एम्प्लॉईज युनियन चे फलक अनावरण केले तसेच  ब्रिटानिया इंडस्ट्रीयल लिमिटेड रांजणगाव व ब्रिटानिया एम्प्लॉईज युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ब्लड बँकेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

     फलक अनावरण सोहळा व रक्तदान शिबिराला सर्व कामगार बंधू भगिनी, व्यवस्थापन प्रतिनिधी, कंत्राटी कामगार बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तसेच रक्तदान शिबिरासही उस्पूर्त प्रतिसाद देऊन आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रक्तदान केले.जवळपास 195 जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला परंतु हिमोग्लोबिन आणि इतर काही कारणांमुळे रिजेक्ट झालेले इच्छुक सोडून एकूण 144 जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.

     या दोन्ही कार्यक्रमास राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष मा.श्री.Adv.किशोर ढोकले साहेब , ब्रिटानिया इंडस्ट्रीज लि. कंपनीचे क्लस्टर हेड माननीय श्री. किशोर कुलकर्णी साहेब, फॅक्टरी मॅनेजर, श्री.श्रीनिवास राव साहेब , क्लस्टर एच.आर. हेड श्री.क्रिष्णात पाटील साहेब, युनिट हेड श्री.रमेश शिंदे साहेब तसेच ब्रिटानिया इंडस्ट्रीयल एम्प्लॉईज युनियनचे सभासद , तसेच युनियनचे अध्यक्ष दिनेश पाटील ,जनरल सेक्रेटरी हनमंत सुर्यवंशी, खजिनदार  महेश कुंभार ,उपाध्यक्ष अमीर तांबोळी, कार्याध्यक्ष अरविंद देवारे , जॉइंट सेक्रेटरी- संदीप राऊत,सह.खजिनदार -सुशांत पुजारी ,सदस्य- कुशाल बोऱ्हाडे,तेजस जोरवर हे वरील सर्व मान्यवर उपस्थित होते.