पुणे :रांजणगाव एमआयडीसी येथील ट्रान्सफिक्स इंडिया प्रा. लिमि.(Transfix India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि ट्रान्सफिक्स इंडिया कामगार संघटना यांच्यामध्ये चौथा वेतनवाढ करार संपन्न झाला. सदर वेतनवाढ करार हा ट्रान्सफिक्स इंडिया कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघहितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता,सुरक्षा, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे पूर्ण झाला.
करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे :
करार कालावधी : करार हा माहे १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२८ अशा चार वर्षाकरिता करण्यात आला.
कराराचे चार वर्षासाठी लागू असणारे टप्पे खालीलप्रमाणे
१) प्रथम वर्षासाठी ३०% रक्कम - ६९००/-
२) द्वितीय वर्षासाठी ३०% रक्कम - ६,९००/-
३) तृतीय वर्षासाठी २०% रक्कम - ४,६००/-
४) चौथा वर्षासाठी २०% रक्कम - ४६००/-
जादा कामाचा मोबदला म्हणून स्थूल वेतनाच्या (ग्रॉस वेजिस) दुप्पट दराने वेतनाची रक्कम दिली जाईल. ही सुविधा मागील कराराप्रमाणे आहे तशीच चालू राहील.
सर्व कामगारांना सेवा बक्षीस नव्याने चालू करण्यात आला आहे .
१५ वर्ष सर्विस - रु.१५०००/-
२० वर्ष सर्विस - रु.२००००/-
२५ वर्ष सर्विस - रु.२५०००/-
३० वर्ष सर्व्हिस- रु.३००००/-
३५ वर्ष सर्व्हिस - रु.३५०००/-
१) SL - १०, २) CL - १०, ३) PL - २५ २४० दिवसाला व तसेच पुढील १४ दिवसाच्या कामासाठी १ रजा करारामध्ये नव्याने चालू करण्यात आली आहे.
प्रत्येक कामगारांच्या घरी कोणाचे दुःखत निधन झाले तर त्या कामगाराला ३ दिवस सुट्टी देण्याचे मान्य केले आहे.
१) इमर्जन्सी लोन १ लाख रुपये दिले जातील व त्याची परत फेड १२ समान हप्त्यामध्ये केली जाईल.
२) इमर्जन्सी हॉस्पिटलसाठी २ लाख रुपये दिले जातील व त्याची परत फेड १२ समान हप्त्यामध्ये केली जाईल.
१) रजेची साठवणुक (PL) व ( Sl) ६० दिवसापर्यंत करण्याचे मान्य केले आहे.
मेडिक्लेम पॉलिसी 3 लाख रुपये राहील .
(स्वतः कामगार, आई वडील ,पत्नी , मुले इ.)
वार्षिक (सीटीसी) पगाराच्या 5 पट रक्कम देण्यात येईल..असे मान्य करण्यात आले .
युनियन कमिटी मेंबर यांनी सुद्धा चांगले अथक प्रयत्न आणि मार्गदर्शन केले.
सदर करारवेळी व्यवस्थापनाच्या वतीने अभिलाष मिश्रा ( MD), पुनीत भाटिया (E Director), चंद्रशेखर जगदाळे (HR हेड), समीर टेंबुर्निकर (Finanace manager) तसेच कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष शशिकांत वाबळे, उपाध्यक्ष दिगंबर आवलकोंडे, उपाध्यक्ष संदीप कोलते, ज.सेक्रेटरी आप्पासो जाधव, खजिनदार गिरीधर आलट, सह.सेक्रेटरी वैशाली शेरकर, सहखजिनदार संदीप गोरडे उपस्थित होते.
ट्रान्सफिक्स इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीमधील सर्व कामगारानी केलेले सकारात्मक काम, राखलेला सयंम , सहकार्य व महत्वाचे म्हणजे युनियन प्रतिनिधी यांच्यावर ठेवलेला विश्वास याच्या बळावर हा करार यशस्वी, शांततामय व जल्लोशात संपन्न झाला अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.