पुणे : लोणीकंद, पुणे येथील व्हॅलिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Valeo India Pvt. Ltd.) येथे शिवगर्जना कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये पाचवा वेतनवाढ करार मंगळवार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न झाला.
सदर वेतनवाढ करार हा शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते श्री. संतोष (आण्णा)बेंद्रे व संघटनेचे पदाधिकारी यांच्यावर संघटनेच्या सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघहितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता,सुरक्षा, शिस्त यावर पूर्ण विश्वास यामुळे 13 महिन्यांच्या कालावधीनंतर पूर्णतः आनंदी वातावरणात पार पडला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
सदर करार हा माहे १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२६ अशा तीन वर्षाकरिता करण्यात आला.
३ वर्षासाठी २२,००० /- रुपये इतकी भरघोस पगारवाढ देण्याचे मान्य केले . या करारानंतर जास्तीत जास्त (CTC) सिनियर कामगाराला ९२,५००/- रूपये आणि कमीत कमी ज्युनियर कामगाराला ८१,७००/- रुपये इतका पगार असेल.
१) प्रथम वर्षासाठी ५०% रक्कम - ११,०००/-
२) द्वितीय वर्षासाठी ३०% रक्कम - ६,६००/-
३) तृतीय वर्षासाठी २०% रक्कम - ४,४००/-
कसल्याही प्रकारच्या उत्पादनाशी निगडित पगारवाढ नाही
सर्वांना समान पगार वाढ
फरकाची रक्कम :
फरक (एरियस्) १००% करारावर स्वाक्षरी केल्यानंतर देण्याचे मान्य केले आहे.
पुढील ३ वर्षासाठी दिवाळी बोनस खालील प्रमाणे
१) पहिल्या वर्षासाठी २०२४ - ५५०००/-
२) दुसऱ्या वर्षासाठी २०२५- ६००००/-
३) तिसऱ्या वर्षासाठी २०२६ - ७००००/- रूपये देण्याचे मान्य केले.
प्रत्येक दिवसाला शिफ्ट अलाउन्स हा मागील कराराप्रमाणे आहे तसाच चालू राहील ( CTC व्यतिरिक्त )
1) पहिली शिफ्ट - २०/-
2) दुसरी शिफ्ट - ३०/-
3) तिसरी शिफ्ट - १४०/-
१) २६ दिवस हजर - १४००/-
२) २५ दिवस हजर - १०००/-
३) २४ दिवस हजर - ५००/-
४) २३ दिवस हजर - ३००/-
जादा कामाचा मोबदला म्हणून स्थूल वेतनाच्या (ग्रॉस वेजिस) दुप्पट दराने वेतनाची रक्कम दिली जाईल. ही सुविधा मागील कराराप्रमाणे आहे तशीच चालू राहील.
तसेच R&D आणि मेंटेनन्स खात्यातील ऑपरेटरना एक रविवार आड एक रविवार साप्ताहिक सुट्टी दिली जाते. या ऑपरेटरनी रविवारी या दिवशी प्रत्यक्ष कामावर हजर असल्यावर प्रत्येकी १५०० रुपये भत्ता म्हणून दिले जातील मागील भत्त्यात १००० ने वाढ करण्यात आली.
सर्व कामगारांना सेवा बक्षीस नव्याने चालू करण्यात आला आहे .
०५ वर्ष सर्विस - ५०००/-
१० वर्ष सर्विस - १५०००/-
१५ वर्ष सर्विस - ३००००/-
१) SL - ७
२) CL - ७
३) EL - २६
रजा ची सुविधा मागील करारामध्ये ठरल्याप्रमाणे वर्षाला टोटल ४० सुट्या आहे तशाच चालू राहतील.
प्रत्येक वर्षातून एकदा करण्याचे मान्य केले तसेच प्रत्येक सभासदाला दरवर्षी एक बारबिक्युनेशन चे कूपन देण्याचे नव्याने मान्य केले आहे.
प्रत्येक कामगाराला २ अपत्यापर्यंत ५ पितृत्व रजा नव्याने देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
प्रत्येक कामगारांच्या घरी कोणाचे दुःखत निधन झाले तर त्या कामगाराला ५ दिवस सुट्टी देण्याचे मान्य केले आहे.
चालु असलेल्या सुविधा व्यतिरिक्त कुटलेही जादा शुल्क आकारले जाणार नाही.
१) 1st आणि 2nd शिफ्ट ला जेवणामध्ये केळी आणि नाईट शिफ्टमध्ये दूध देण्याचे मान्य केले .
२) तसेच आठवड्यातून १ वेळेस अंडाकरी व त्याच दिवशी शाकाहारी जेवणामध्ये पनीर मसाला ही भाजी ठेवण्यात येईल.
३) उन्हाळ्यामध्ये चहा ऐवजी सरबत देण्यात येईल.
४)जेवणामध्ये नव्याने ताक/दही समाविष्ट केले जाईल.(मार्च, एप्रिल,मे,ऑक्टोबर या महिन्यामध्ये)
५) नाष्ट्यामध्ये पोहे रस्सा चालू करण्यात आला आहे.
१) गणवेशाचे प्रतिवर्ष दोन संच तसेच (वॉर्निंश मशीन व मेंटेनन्स या कामगारांकरीता नव्याने १ वाढीव पॅन्ट देण्याचे मान्य केले आहे.)
२) प्रत्येक वर्षी १ टी शर्ट तसेच ३ वर्षातून २ वेळा जर्किन देण्याचे मान्य केले .
३) प्रतिवर्षी सर्व कामगारांना १ जोडी सेफ्टी शूज देण्याचे मान्य केले आहे.
१) नविन घर (प्रथम घरासाठी) बांधणीसाठी २ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. त्याची परत फेड २४ समान हप्त्यामध्ये राहील.
२) लग्नासाठी १.५ लाख रूपये देण्याचे ठरले आहे (स्वतः, भाऊ, बहीण) व त्याची परत फेड २४ समान हप्त्यामध्ये केली जाईल.
३)शिक्षणासाठी २ लाख रुपये दिले जातील व त्याची परत फेड २४ समान हप्त्यामध्ये केली जाईल.
४) इमर्जन्सी हॉस्पिटल साठी १ लाख रुपये दिले जातील व त्याची परत फेड १२ समान हप्त्यामध्ये केली जाईल.
१) रजेची साठवणुक (EL) ७२ दिवसापर्यंत करण्याचे मान्य केले आहे.
२) सिक लिव्ह (SL) २१ पर्यंत साठवणूक करण्याचे मान्य केले आहे.
मेडिक्लेम पॉलिसी २ लाख रुपये राहील तसेच २५ लाख रुपये जी बफर अमाउंट आहे त्यात काही बदल करण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे.
वर्ष २०२३ मध्ये जर २५ लाखांच्या पुढे खर्च गेला तर २०२४ मध्ये बफर अमाऊंट मध्ये १० लाख रुपये ने वाढ करून ती ३५ लाख रुपये इतकी करण्यात येईल.
तसेच ३५ लाख रुपये या रकमेपेक्षा जास्त खर्च झाला तर त्याच्या पुढील वर्षी १० लाखाने वाढ करून ती ४५ लाख रुपये केली जाईल.
२५ लाख रुपये ही रक्कम पायाभूत ( बेस )राहील.
ही सुविधा कुटुंबातील या सदस्यांना लागू राहील.(स्वतः कामगार , आई वडील ,पत्नी , मुले इ.)
ग्रुप अँक्सिडेंट पॉलिसी मागील कराराप्रमाणे ७ लाख ही तशीच राहील.
सर्व कामगारांना ५ लाख रुपये टर्म इन्शुरन्स नव्याने चालू करण्यात आला आहे.
एखाद्या कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या वारसास कायम स्वरूपी नोकरी दिली जाईल.( पत्नी, मुलगा,मुलगी )
कामगाराच्या मुलगा किंवा मुलगी जन्मानंतर २०००/- रूपये संबधित कामगारास बक्षीस म्हणून दिली जाईल.(जास्तीत जास्त दोन अपत्ये ) ही सुविधा जुन्या कराराप्रमाणे तशीच चालू राहील.
प्रत्येक सभासद कामगाराला स्वतःच्या लग्नासाठी ७०००/- रुपये एवढी रक्कम भेट म्हणून दिली जाईल .ही योजना मागील करारातील तरतुदीनुसार आहे तशीच चालू राहील.
व्हॅलिओ पुणे प्लांट मधील सर्व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार + जमा झालेल्या रकमेच्या डबल रक्कम ही कंपनी कडून देण्यात येईल.अशी एकत्रित करुण जी रक्कम जमा होईल ती त्या मृत कामगाराच्या कुटुंबियाना मदत म्हणून देण्यात येईल .ही सुविधा मागील कराराप्रमाणे आहे तशीच चालू राहील.तसेच कंपनी १० लाख लमस्म अमाऊट देण्याचे मान्य केले आहे.
सदर करारावेळी युनियन च्या वतीने शिवगर्जना कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष (अण्णा) बेंद्रे तसेच युनियन कमिटी मेंबर अध्यक्ष किशोर मराठे, कार्याध्यक्ष सतिश घाडगे, उपाध्यक्ष सुजीत खडसे, ज.सेक्रेटरी बाळू सांगळे, खजिनदार संदीप जेजूरकर, सह.सेक्रेटरी प्रशांत खर्चे, सहखजिनदार अमित सावंत तसेच व्यवस्थापनाच्या वतीने नितीन चौधरी (Site GM), मोहन सुंदरम (India ER Director), शशांक मोघे (HR हेड), तुषार सुर्वे (ER manager), राहुल कर्णिक (Production Manager) उपस्थित होते.