पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड चाकण चॅप्टर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट (NIPM) यांनी स्वातंत्र्य दिन विशेष पद्धतीने साजरा करत मदर तेरेसा डेस्टिट्यूट होम फॉर मेन, काळभोर नगर, चिंचवड येथे दान उपक्रमाचे आयोजन केले.
एन आय पी एम, पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर हा सदैवच मनुष्यबळ विभागातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या प्रतिनिधी मार्फत कामगार व कारखानदारी संबंधी कायदे, विविध सरकारी धोरणे, औद्योगिक विकास, इंडस्ट्री करता भेडसावणाऱ्या विविध समस्या, स्किल डेव्हलपमेंट, रोजगार मिळावे त्याचप्रमाणे मनुष्यबळ क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांची उन्नती व विकासाकरता सदैव कटिबद्ध असतो. तसेच या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या सामाजिक बांधिलकी प्रति शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, व पर्यावरण विषयक विविध योजना राबवीत असतो. या चाप्टर चे सदस्य हे पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, भोर, हिंजवडी, शिरवळ फिरंगुट, सातारा व कोल्हापूर सह आदी नामांकित औद्योगिक परिसरामध्ये मनुष्यबळ विभागात काम करणारे अधिकारी या चाप्टर चे सदस्य आहेत.
या उपक्रमात चाप्टरच्या सदस्यांनी उत्साहाने सहभाग घेत जीवनावश्यक वस्तूंचे योगदान दिले. यात सदरहू संस्थेमध्ये लागणारे फर्निचर, विविध प्रकारचे कपडे, टी-शर्ट्स, धान्य, कडधान्य, मसाले, जीवनावश्यक वस्तू व दैनंदिन वापराकरता लागणारे किराणा साहित्य त्याचप्रमाणे सॅनिटायझेशन किट्स यांचा समावेश होता. यावेळी या संस्थेतील अनाथ व अपंग गरजूंना चाप्टरच्या सदस्यांमार्फत खाऊ वाटप देखील करण्यात आले, या उपक्रमामुळे 120 पेक्षा जास्त गरजूंना या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंची मदत करून स्वातंत्र्य दिन हा वेगळ्या पद्धतीने साजरा करून गरजूंच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला.
या प्रसंगी चॅप्टर नेतृत्व करणारे चेअरमन श्री. प्रदीप मानेकर, सचिव नवनाथ सुर्यवंशी, उपाध्यक्ष अर्जुन माने, कार्यकारणी सदस्य व इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशन चे अध्यक्ष महेंद्र फणसे तसेच इतर कार्यकारिणी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “एनआयपीएम ही भारतातील आघाडीची एचआर संस्था असून, सामाजिक जबाबदारी पेलणे व समाजातील प्रत्येक गरजू घटकाकरिता मदत करणे आमचे ध्येय आहे. उद्योग व कार्यक्षेत्रांच्या पलीकडे जाऊन मानवी जीवनात सन्मान व करुणेने योगदान देणे हीच खरी मनुष्यबळ विभाग ची भूमिका आहे."
या उपक्रमामुळे आश्रमातील अपंग व परिवारातील सदस्य नसणाऱ्या रहिवाशांना आवश्यक मदत मिळाली व चॅप्टरच्या समाजाभिमुख बांधिलकीचे दर्शन घडले. उपस्थित सदस्यांनी सांगितले की, लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद व कृतज्ञता यामुळे स्वातंत्र्य दिनाचा सण अधिक अर्थपूर्ण ठरला.
चाप्टरच्या सदस्यांनी उद्योजक, व्यावसायिक व नागरिकांना अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग घेण्याचे व समर्थन देण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे सेवाभाव, मानवता व सामूहिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होईल व खऱ्या अर्थाने मनुष्यबळ विभागाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक बांधिलकी प्रतिबद्ध राहून चांगले सामाजिक कार्य आपल्या हातून घडेल व समाजातील शोषित पीडित व गरजूंना एक मदतीचा हात मिळेल. याप्रसंगी चाप्टरचे पदाधिकारी संपत पारधी, राहुल निंबाळकर, अमित देशपांडे, रमेश बागल, दत्तात्रेय नकाते, सतीश कुलकर्णी व विजय पाटील यांनी सहभाग नोंदविला. हा उपक्रम यशस्वी होण्याकरता चाप्टरच्या प्रथम खजिनदार प्रीती पाटील, विश्वजीत पाटील, सीमंतिनी काटकर, निलेश नाफडे व निलेश देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली.