बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Benteler Automotive India Pvt Ltd) येथे वेतनवाढ करार संपन्न

चाकण : औद्योगिक वसाहत मधील सावरदरी येथील नामांकित बेंटलर ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Benteler Automotive India Pvt Ltd) कंपनी व्यवस्थापन आणि शिवक्रांती कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या चौथा ऐतिहासिक  वेतनवाढ करार संघटनेचे सर्वेसर्वा सरचिटणीस ॲड. विजयराव पाळेकर, खजिनदार रविंद्रजी साठे, वरीष्ठ चिटणीस गुलाबराव मराठे, कंपनीचे जनरल मॅनेजर मुकुंद गणगणे , एच आर हेड संदीप जोशी ,प्लांट ऑपरेशन हेड योगेश थोरात तसेच मॅनेजमेंट टीम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

वेतनवाढ करार पुढील प्रमाणे :

एकूण पगारवाढ : रु.२१,०००/-(एकवीस हजार रुपये)
पहिल्या वर्षी ४०%, 
दुसऱ्या वर्षी ३५%, 
तिसऱ्या वर्षी २५% मिळणार.

कराराचा कालावधी : दि.०१/०१/२०२४ ते ३१/१२/२०२६ या तीन वर्षांचा राहील.

करार फरक रक्कम : प्रत्येक कामगाराला १ जानेवारी पासुनचा १००% फरक देण्यात येणार आहे.

मेडिक्लेम पॉलीसी :  कुटुंबासाठी रु.२,००,०००/- रुपयांची पॉलिसी राहणार असून पूर्वी आजार साठी असणारे अमाउंट कॅपिंग (आजारासाठी असणारी ठराविक रक्कम)काढण्यात आले असून सर्व रक्कमेचा लाभ कामगारांना वापरण्यात येईल तसेच गरज पडल्यास बफर मधून ₹ १,००,०००/- देण्याचे मान्य करण्यात आले या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, २ मुले आणि आई-वडील यांचा समावेश करण्यात आला आहे.

मेडिकल हेल्थ चेक अप :
कंपनीकडून होणारे वार्षिक हेल्थ चेक अप आहे असे चालू ठेऊन त्यामध्ये HBA1C and LIPID PROFILE या महत्त्वाच्या मेडिकल टेस्ट नव्याने ऍड करण्याचे मान्य करण्यात आले.

बढती पत्र :
जे कामगार लाईनवर सेटर नसताना सेटरचे काम करतात त्यांना अधिकृत सेटर म्हणून लेटर देण्याचे तसेच त्यांना आवश्यक ट्रेनिंग मान्य करण्यात आले.

ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : चोवीस तास कव्हर असणारी रु.१०,००,०००/- (दहा लाख) रुपयांची पॉलिसी वाढवून रु.२०,००,०००/- (वीस लाख)देण्याचे मान्य करण्यात आले आहे.

सुट्ट्या : 
A) EL - २१, B) SL - ०४ C) CL - ०७, D) PH - ९
यामध्ये ३ - CL या EL मध्ये जमा करण्यात आल्या असून कामगारांना त्याचा फायदा मासिक हजेरी भत्ता तसेच वर्षांअखेरीला शिल्लक रजेचा मिळणारा मोबदला यामध्ये होईल.
तसेच मागे ठरल्याप्रमाणे २५० दिवस हजर राहिल्यानंतर १ अशी प्रत्येक १० दिवसासाठी १ रजा EL मध्ये वर्षांअखेर जमा होईल ही रजा सुविधा आहे तशी चालू ठेवण्यात आली.
मतदानाची सुट्टी :  सरकारी आदेशानुसार राहील.

दिवाळी बोनस : सर्व कामगारांना दिवाळी बोनस मागील प्रथेनुसार प्रतिवर्षी दिवाळीअगोदर मीटिंग करून जो ठरेल तो देण्यात येईल. 

दिवाळी भेटवस्तू  : दिवाळीला युनियन प्रतिनिधिंशी चर्चा करून ड्राय फ्रूट किंवा मिठाई तसेच एक भेटवस्तू देण्याचे मान्य झाले आहे.

मासिक हजेरी बक्षीस : 
१) संपूर्ण दिवस हजर - रु.२८००/- जे पूर्वी ₹ २५०० / - होते.
२) १ दिवस सुट्टी  - रु.१४००/- जे पूर्वी ₹ १२५०/ - होते.

दीर्घ सेवा बक्षीस:
अ) १५ वर्षे नोकरी झाल्यास रु.१०,०००/- व सन्मानचिन्ह
ब) २० वर्षे नोकरी झाल्यास रु.१५,०००/- व सन्मानचिन्ह

वैयक्तिक कर्ज सुविधा : प्रत्येक कामगारास CTC पगाराच्या तीन पट पगार कर्ज म्हणून देण्याची सुविधा आहे अशी चालू ठेवण्यात येणार आहे.

ड्रेस आणि शूज : मागीलप्रमाणे आहे तशी सुरू ठेवण्यात आली आहे ज्यामध्ये
अ) ड्रेस - ३ शर्ट आणि पॅन्ट कापड (उच्च प्रतीचे) शिलाई भत्त्यासह
ब) शूज - उच्च प्रतीचे 
क) दरवर्षी दोन टी शर्ट किंवा हिवाळी जॅकेट किंवा सॅक युनियन प्रतिनिधीशी चर्चा करून देण्यात येईल.

रात्र पाळी भत्ता : रात्र पाळी भत्ता ३० रुपयांनी वाढवून प्रति दिवस ₹१००/- करण्यात आला.

कॅन्टीन आणि बस सुविधा : 
आहे तशी सुरू ठेवण्यात येणार आहे त्यामध्ये कोणतेही आगाऊ रक्कम कामगारांना द्यावी लागणार नाही.

या व्यतिरिक्त मागील करारातील यात उल्लेख नसलेल्या सेवाशर्ती आहे तश्याच चालु राहतील.

    यावेळी करारावरती संघटनेच्या वतीने शिवक्रांती कामगार संघटनेचे सरचिटणीस ॲड.विजय पाळेकर, रवींद्र साठे, गुलाबराव मराठे कंपनीच्या व्यवस्थापन वतीने मुकुंद गणगणे (जनरल मॅनेजर), संदीप जोशी (एचआर विभाग प्रमुख), योगेश थोरात (प्लांट मॅनेजर), संतोष आंधळे (क्वालिटी मॅनेजर), आशिष कोठालकर (लॉजीस्टिक मॅनेजर) युनिटच्या वतीने सतीश केदारी (अध्यक्ष), सागर देवकर (सरचिटणीस), पांडूरंग आहेर (कार्याध्यक्ष), विनोद चौधरी (खजिनदार), सुशांत ढवळसकर (उपाध्यक्ष) यांनी सह्या केल्या.