भरीव पगारवाढ न मिळाल्यास आंदोलनात बदल करण्यात येईल तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल - संतोष (आण्णा) बेंद्रे , अध्यक्ष शिवगर्जना कामगार संघटना
पुणे : लोणीकंद, पुणे येथील व्हॅलिओ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये शिवगर्जना कामगार संघटना कार्यरत असून कंपनी व्यवस्थापन आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये जुलै २०२३ पासून कामगाराच्या वेतनवाढ व सेवा शर्तीबाबत बोलणी सुरू आहे. मागील १३ महिन्यापासून वेतनवाढ करार प्रलंबित असून व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे सदरील करार होण्यास विलंब होत असल्याने व्यवस्थापनाच्या विरोधात दि. २८ ऑगस्ट २०२४ पासुन सर्व कामगारांनी डोक्याला काळ्या फिती बांधुन बेमुदत जाहिर निषेध नोंदविला आहे.
सदरील आंदोलन शांततामय मार्गाने चालु असुन व्यवस्थापनाकडून योग्य भरीव पगारवाढ न मिळाल्यास आंदोलनात बदल करण्यात येईल तसेच आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असे संघटनेचे अध्यक्ष संतोष (आण्णा) बेंद्रे यांनी सांगितले.
