कामगाराला मिळाली अपघात नुकसान भरपाई

कामगारा ला भारतीय औद्योगिक अर्थवेवस्थेचा कणा मानलं जात कारण तो स्वतः श्रम करून औद्योगिक क्षेत्र भरभराटीस आणण्याचं काम करत असतो. कामगार ला कायद्यानं एक दुर्बल घटक म्हणूंन संबोधित करून त्याला कायद्याचे संरक्षण मिळावे या उद्धेश्याने  वेगवेगळे कायदे करून त्याला व त्याच्या परिवारास विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे हाच त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे. 

     हा उद्देश नजरे समोर ठेऊन 'कामगार नामा' मध्ये या पुढे आपण कामगार बंधू, भगिनींच्या मागणी नुसार "कामगार  न्याय जगत" हे नवे सदर सुरु करत आहोत त्या माध्यमातून कामगार बंधू-भगिनींना कामगार न्यायालयाने दिलेले न्यायनिर्णय सोप्या स्वरूपात माहिती करून देणार आहोत.

          आज आपण कामगार नुकसान भरपाई कायदा १९२३ (Employee's Compensation Act 1923) नुसार एका कामगार बंधुस कशा प्रकारे नुकसान भरपाई मिळाली ते थोडक्यात जाणून घेणार आहोत. -

     नाशिक मधील एका नामांकित  कंपनी मध्ये काम करणारे एक कामगार याने कंपनी कडे अपघात नुकसान भरपाई मिळने साठी कामगार आयुक्त व कामगार न्यायालय (Labour Court) कडे अर्ज केला. अर्जदार यांनी कंपनी कडून नुकसान भरपाई म्हणून जमा केलेली रक्कम मिळणे साठी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला होता.

     अर्जदार कामगार ज्या वेळी कंपनीत १४ सप्टेंबर २०१९ रोजी काम करत असताना अपघात झाला होता. त्या नुसार कंपनीने या अपघाताची जबाबदारी घेत नुकसान भरपाई रक्कम रु ३,००,५२१/- कोर्ट मध्ये जमा केली होती. सदर जमा केलेली रक्कम अर्जदार कामगाराला मिळावी म्हणून हा अर्ज दाखल केला होता.

      या अर्ज वरती कंपनीने सांगितले की, अर्जदार कामगार याला कंपनी नुकसान भरपाई रक्कम देण्यास तयार आहे. त्यानुसार अर्जदार कामगार याने हि सदर रक्कम घेणेस तयार होऊन भविष्यात वाढीव नुकसान भरपाई रक्कम मिळणे साठी कंपनी विरोधात दावा अगर अर्ज करता येणार नाही.

     या अर्जात निकाल देताना माननीय कामगार न्यायालयाने अर्जदार कामगार चे आधार कार्ड व तो कंपनीत काम करत असले बाबत चे ओळखपत्र तपासून घेऊन खालील निकाल दिला.

१) अर्जदार यांचा अर्ज मंजूर केला.

२) सदर अपघात नुकसान भरपाई रक्कम बँकेत जमा करणेत यावी.

३) अर्जदार कामगार याची योग्य ती ओळख पटवून त्यांना सदर रक्कम व्याजा सहित सुपूर्त करणेत यावी.      

-  (संदर्भ - - All.Wc (DISTRIBUTION) No.1/A-1 of 2021 C.N.R.MHLC-15000001-2021)

         सदर निकाला मधील एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घेणे जरुरीचे आहे कि, जर कामगार हा एखाद्या कंपनी विरोधात काही दाद मागत असेल  त्यावेळी त्याचे कडे त्या कंपनीत काम करत असले बाबतचे  ओळखपत्र असणे गरजेचे  व अत्यंत महत्वपूर्ण आहे.

      -: शब्दांकन :-
अ‍ॅड.संजय दत्तात्रय नाळे        
बारामती (9689450764)