लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियनच्या १३ व्या वर्धापनदिनानिमित्त लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियन,लॉरियाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चाकण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात मुख्यत्वे करून पूना ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिराला सर्व कामगार बंधू भगिनी, व्यवस्थापन प्रतिनिधी, कंत्राटी कामगार बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपली समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत रक्तदान केले.जवळपास ३४० जणांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला परंतु हिमोग्लोबिन आणि इतर काही कारणांमुळे रिजेक्ट झालेले इच्छुक सोडून एकूण २६५ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान केले.सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट,पाच लाख रुपयेचा इन्शुरन्स,एक छोटीशी भेटवस्तू देण्यात आली.
या शिबिराला लॉरियाल इंडिया कंपनीचे फॅक्टरी हेड माननीय अमित गर्ग साहेब, प्रोडक्शन हेड सत्या सिंग, एच.आर. हेड संतोष कदम, आशुतोष चतुर्वेदी, विशाल सिंग,मयूर शेवते,प्रवीण शिंदे तसेच लॉरियाल इंडिया एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अविनाश वाडेकर,जनरल सेक्रेटरी गणेश बोचरे, खजिनदार रवी साबळे,उपाध्यक्ष निलेश पाटोळे, कार्याध्यक्ष कमलेश गावडे, जॉइंट सेक्रेटरी- रूपाली शिंदे, मुकुंद महाळुंकर,सदस्य- किशोर दाभाडे,गणेश आरुडे, अंकुश ताठे, श्रद्धा सरकार तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने अविनाश राऊत उपस्थित होते.