पुणे : रांजणगाव एम.आय.डी.सी मधील मास्किओ गास्पारदो इंडिया प्रा.लिमि. (Maschio Gaspardo India Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि मास्किओ गास्पारदो इंडिया कामगार संघटना यांच्या वतीने येथील कायमस्वरूपी कामगारांसाठी पगार वाढीचा व अन्य सुविधांचा करार अतिशय मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात दि.10 जुलै 2024 रोजी संपन्न झाला.
वेतनवाढ करार ठळक मुद्दे पुढील प्रमाणे :
करार कालावधी : दि. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2026
कराराची रक्कम ही तीन वर्षासाठी तीन टप्प्यात (रु.5000 +रु.4000+रु.4000) देण्याचे मान्य करण्यात आहे.
सहा महिन्याचा फरक पुढील पगारात देण्यात येईल हे मान्य करण्यात आले
मेडिक्लेम पॉलिसी : पाच लाखापर्यंत मान्य करण्यात आली त्यामध्ये ( पती, पत्नी, दोन मुले, आई-वडिल, मुलांचे वय 21वर्षापर्यंत ) मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम हा सीटीसीचा भाग राहणार नाही असे कंपनी व्यवस्थापनाकडून मान्य करण्यात आले.
रजा : रजेमध्ये कपात अथवा वाढ करण्यात आली नाही. पुर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्या.
दिवाळी बोनस : संघटनेशी चर्चा करून देण्याचे मान्य करण्यात आले.
तसेच सर्व कामगारांना हिवाळी /पावसाळी जर्किन देण्याचे ठरवण्यात आले.
ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसी : ग्रुप पर्सनल एक्सीडेंट पॉलिसीचे बेनिफिट हे सीटीसी च्या चार पट एक्सीडेंट डेथमध्ये कामगाराच्या कुटुंबाला देण्याचे मान्य करण्यात आले.
इतर सुविधा : बस सुविधा, कॅन्टीन व इतर सोयी सुविधा या आहे तशाच ठेवण्यात आलेल्या आहे व त्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे कटिंग पगारातून करण्यात आलेले नाही.
फॅमिली गेट-टुगेदर : हे वर्षातून एकदा करण्याचे मान्य करण्यात आले व त्यासंदर्भात दिनांक व ठिकाण मिटिंग करून ठरवण्यात येईल असे म्हणणे मान्य करण्यात आले.
ज्येष्ठत्व अवॉर्ड : ज्या कामगारांची सर्विस दहा वर्षे अशी झालेली आहे त्यांना रु.25000/- देण्याचे मान्य करण्यात आले व तसेच ते अवॉर्ड फॅमिली डे च्या दिवशी देण्याचे मान्य करण्यात आले.
कंपनी प्रोडक्ट नवीन मशीन Employee स्कीम मध्ये 10% व Non- Moving मधील मशीन वरती 25% डिस्काउंट हे कंपनीची प्रोडक्ट खरेदी करताना कामगारास देण्यात येईल असे मान्य करण्यात आले.
ट्रेनिंग साठी देशामध्ये अथवा परदेशामध्ये पाठवण्यात येईल. परदेशातील ट्रेनिंग नंतर कामगाराला तीन वर्षे कंपनी सोडता येणार नाही हे सर्वानुमते मान्य करण्यात आले.
कामगारांनी कामाची उत्पादकता तसेच क्वालिटी गुणवत्ता टिकवून काम करण्याचे मान्य करण्यात आले.
हा करार संपन्न होण्यासाठी व्यवस्थापनाकडून मंगेश कटारिया (M.Director), संजीवकुमार दास (G. Manager), मॕन्युअल (Plant Head), विजय पाटील (H.R.Head), दास (CFO), किरण शिंदे (HR dept) व संघटनेच्या वतीने सुरेश बगाटे (अध्यक्ष), राजेंद्र पागळे (उपाध्यक्ष), अशोक चव्हाण (जन. सेक्रेटरी), दिगंबर जाधव (खजिनदार), सतिश भोंग (सरचिटणीस), अजित सूर्यवंशी (संघटक), आनंद बुचकुले (सदस्य) काम पाहिले.
हा करार सफल होण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोरजी ढोकले यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार व ध्येयधोरणानुसार आम्ही युनियन कमिटीने टेबल डिस्कशन व कंपनीची प्रगती हीच कामगारांची प्रगती यानुसार हा करार यशस्वी करू शकलो तसेच सहकारी मार्गदर्शक गोरक्ष वाळके, एलरिंगक्लींगरचे शरद थिटे, जामील स्टीलचे भगवान चव्हाण, करारो इंडियाचे बाळकृष्ण पंडित तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व सहकार्यांचे मार्गदर्शन लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आले.