सॅमसन कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड (Samson Controls Private Limited) येथे वेतनवाढ करार संपन्न

पुणे : रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील सॅमसन कंट्रोल प्रायव्हेट लिमिटेड (Samson Controls Private Limited) कंपनी व्यवस्थापन आणि सॅमसन कामगार  संघटना रांजणगाव यांच्यामध्ये चौथा वेतनवाढीचा करार, शांततामय उत्साहवर्धक आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. 

करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे :-

कराराचा कालावधी : दि.01/04/2024 ते 31/03/2028 (चार वर्ष)

कराराची रक्कम : रु.17550/-
विभागणी चार टप्प्यात  पुढील  प्रमाणे 
दि.01/04/2024 ते दि. 31/03/2025 - रु.5550/- 
दि. 01/04/2025 ते दि. 31/03/2026 - रु.4000/- 
दि. 01/04/2026 ते दि. 31/03/2027 - रु.4000/-
दि. 01/04/2027 ते दि.31/03/2028  - रु.4000/-                                         .

बोनस : हा  बेसिकच्या डबल मान्य करण्यात  आले.

रात्रपाळी भत्ता : भत्त्यात वाढ करून रु.50/- वरून रु.60/- प्रति दिन एवढी करण्यात आली आहे.

ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी : रु.10 लाख मान्य करण्यात आली.

मेडीक्लेम पॉलिसी : रु.दोन लाख मध्ये वाढ करून रु.तीन लाख पॉलीसी करण्यात आली.

महागाई भत्ता : CPI(W)2016=100 महंगाई भत्ता  हा पर पांईट रु.100/- वाढ करण्यात आली.

टर्म इन्शुरन्स : कमीत कमी रु. 20 लाख व वाढीव रु.50 लाख मान्य करण्यात आले.                              

     सदर करार यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने अतुल राजे (मॅनेजिंग डायरेक्टर), प्रदिप पोळेकर (अकाउंट हेड), विश्वास शिंदें (सिनियर एच.आर. मॅनेजर), संतोष यादव (एच.आर.ॲडमिन हेड) तसेच युनियनच्या वतीने राहुल थोरात (अध्यक्ष), दत्तात्रय जगताप (जनरल सेक्रेटरी), पोपट पवार (उपाध्यक्ष), रणजित बागडे (खजिनदार), निलेश पळसे (सह.सेक्रेटरी), अमोल आरण, साधु यादव (सदस्य ) यांनी करारावर स्वाक्षरी केली.

     सदर करारासाठी मार्गदर्शन श्रमिक एकता महासंघ, अरविंद श्रोती, रोहित पवार यांनी केले तसेच महासंघाचे सल्लागार,कामगार चळवळीसाठी आणि कामगारांच्या हितासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहकार्य लाभले अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.