यवतमाळ (रुस्तम शेख प्रतिनिधी) : आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने १२ जुन राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिल्या नुसार प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर जिल्हा परिषद वर आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार श्रमशक्ती भवन यवतमाळ येथुन आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा घोषणा देत सरळ जि.प.मार्गे संविधान चौक मार्गे नेताजी मार्केट, दत्त चौक मार्गे जुना बसस्टँड मार्गक्रमण करत जिल्हापरीषदेवर मोर्चा धडकला. त्यात शालेय पोषण आहार कर्मचारी यांना २६०००/- मानधन / वेतन द्या व जि.प.शिक्षण विभागात कायम करा या मुख्य मागणी, सह ईतरही मागण्याचे निवेदन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद यवतमाळ यांचे मार्फत पंतप्रधान ,भारत सरकार,केद्रीय शिक्षण मंत्री , मंत्रालय नई दिल्ली तसेच एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,यांना व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.
दिनांक 12/06/2024 रोजीच्या मोर्चात प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजने अंतर्गत शाळेत पोषण आहार तयार करून मुलांना जेवण देणाऱ्या सदर कर्मचाऱ्यांना केंद्रसरकार 60 टक्के व राज्य सरकार 40 टक्के मानधन कोटा देण्याचे धोरण ठरले असतांना सध्या केंद्र शासन दरमहा रू. 600/- व राज्य शासन दरमहा रू. 1900/- असे एकत्रीत दरमहा रु. 2500/- मानधन /वेतन देत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार प्रमाणे मानधनात वाढ केली नाही त्यांना 1 एप्रिल 2023 पासून महीन्याकाठी फक्त रू. 2500/- मानधन मिळतात. एवढ्या तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांनी आपला उदरनिर्वाह कसा चालवायचा ? हा आमच्या समोर खरा यक्ष प्रश्न आहे.
दुसरीकडे मात्र आमदार यांचे दरमहा मानधन दोन लाखाचे जवळपास आणि खासदार यांचे दरमहा मानधन तीन लाखांचा जवळपास व इतर बाकी भत्ते, पेन्शन लागू आहे. मग आमदार, खासदार, मंत्री यांना जगण्याकरीता एवढे मानधन लागतात तर योजना कर्मचारी रू. 2500/- मध्ये ह्या जीवघेण्या महागाईत कसे जगत असतील ? याचाही विचार केंद्र व राज्य सरकारनी करावा. शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्या मानधनात भरीव वाढ करावी अशी आम्ही मागणी करीत आहेत मागण्या शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा किमान वेतन एकत्रित रू. 26,000/- मानधन/वेतन द्या.
शिक्षणमंत्री यांनी दिनांक 18/12/2023 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनात शालेय पोषण आहार कर्मचारी, स्वयंपाकी व मदतनीस यांना दरमहा रू. 1500/- मानधन वाढ देण्याचे कबूल केले. त्याचा शासन निर्णय (जी. आर.) त्वरीत काढण्यात यावा.,मानधन दर महिन्याच्या १ तारखेला द्या व सामाजिक सुरक्षा लागु करा.,त्यांना कामानिमित्त रजा मंजूर करा व बदल्यात दुसऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी करू नका., ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नागरी भागातील कर्मचाऱ्यांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करा.,शाळेतील पटसंख्या कमी झाल्यामुळे पूर्वीपासून काम करणाऱ्या स्वयंपाकी, मदतनीस यांना कायम ठेवा. त्यांच्या सेवाजेष्ठतेचा विचार व्हावा.,स्वयंपाकी व मदतनीस यांना ड्रेस कोड (गणवेश) द्या.,दिनांक 18-19/12/2023 रोजी स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामकाजाबाबत शासन परिपत्रक निर्गमित झाले असून त्याची जिल्हयात काटेकोर अंमलबजावणी करा व कारण नसतांना पोषण आहार कामगारांना कामावरून कमी करू नका. तसेच पूर्वीपासून कार्यरत कामगारांना कायम ठेवा,शालेय पोषण आहार कर्मचारी यांना कामावारून कमी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती ऐवजी गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात यावे,दरवर्षी डॉक्टरचे प्रमाणपत्र मागणे बंद करावे व दरवर्षी करारनामा लिहून घेण्याची पध्दत बंद करा.यासह इतरही मागण्या करण्यात आल्या.
यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे, विलास ससाने विजय ठाकरे शंकरराव कदम, कैलास कांबळे, भारती काळे, दत्ता पवार, ल्याकत बी, गणेश मडावी, वैशाली चिव्हाणे, गिताबाई पुसनाके, सुरेश गायकवाड, करूणा गजभिये, प्रेमिला मरडे, कल्पना सोयाम, मालूताई सनगावकर, नर्मदा मरापे, सुनिता मरसकोल्हे, निर्मला सोनटक्के, विक्की आत्राम, सविता दरेकर, मंगला अर्के, प्रकाश पवार, सुरेखा चौधरी, दिनेश सुरपाम, रविंद्र परचाके प्रविण सोनटक्के, विनोद लोखंडे, नामदेव ढोरे, राजू चव्हाण, सीमा मेशराम, शींदू तीवशे, अंजना शिंदे, शांता माहुरकर, राजेश मेंढे, कवडू सीडाम, राहुल नगराळे, नितीन काळे, ओमप्रकाश पवार, लक्ष्मी जाधव, सुनिता आगोने, जनाबाई चंदनकर, निता भोयर, सीमा चौधरी, गंगाबाई पाईकराव, सुनिता राऊत, अर्चना परचाके, मंगला मेश्राम, सुभद्रा भिसनकर, राधाबाई पाटील, कविता चव्हाण, सुनिता मडावी, साईनाथ बल्की, देवराव झटे, सुमनबाई पद्मा वेलुकर, लक्ष्मी सोयाम, सुवर्णा केवटीवार, आसेफा शेख, मैरूनिसा शेख, शाहीस्ता जहीर, रहीसा शेख, साधना गांवडे, मालती गावंडे, आशा भागडकर, मीरा पिंपरे, सुशीला राउत, गिता वानखडे, मारोती हांमद श्रीराम राठोड, भाऊराव पवार, गजानन राठोड, संगीता खंडारे, चंदा चांमाठे, शोभा येवले, श्रावण उइके, मनीषा कोकाडे, लता आवळे, लक्ष्मी गेडाम, साधना गावंडे, शोभा देवतळे, अर्चना खोब्रागडे, शाम बोबडे, शारदा रामटेके, सुवर्णा काटकोजवार,यासह शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते.