पुणे - खेड : दि. 11 ऑगस्ट 2025 रोजी खेड सिटी येथील मार्स इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे (Mars International India Pvt. Ltd. Pune) कंपनी व्यवस्थापन आणि मार्स इंटरनॅशनल इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्यामध्ये दुसरा वेतनवाढ करार शांततामय, उत्साही आणि आनंदी वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
करार कालावधी : कराराचा कालावधी तीन वर्ष असेल (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८).
पगार वाढ : एकूण पगार वाढ
एकूण सरासरी वेतनवाढ रु. 17,980/- झाली आहे, ज्यामध्ये रु. 15,800/- निश्चित वेतनवाढ आणि 2% ते 3% कार्यक्षमतेशी संलग्न (Performance Linked Increment) समाविष्ट आहे.
एकूण सरासरी वेतनवाढ रु. 18,960/- झाली आहे, ज्यामध्ये रु. 16,150/- निश्चित वेतनवाढ आणि 2% ते 3% कार्यक्षमतेशी संलग्न (Performance Linked Increment) समाविष्ट आहे.
एकूण सरासरी वेतनवाढ रु. 21,051/- झाली आहे, ज्यामध्ये रु. 16,680/- निश्चित वेतनवाढ आणि 2% ते 3% कार्यक्षमतेशी संलग्न (Performance Linked Increment) समाविष्ट आहे.
फरक रक्कम : दि. १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीतील फरक रक्कम एकरकमी देण्याचे मान्य करण्यात आले.
बोनस : बोनस कायद्यानुसार देण्याचे ठरले.
नाईट शिफ्ट अलाऊंस : प्रति प्रत्येक नाईट शिफ्टसाठी रु. 120/- नाईट शिफ्ट भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
रजा : Total 30 Days (PL - 18 & CL-12) पॉलिसीनुसार देण्यात येईल.
पेड हॉलिडेज : 13 Days वार्षिक पॉलिसीनुसार देण्यात येईल.
ग्रुप लाइफ टर्म इन्शुरन्स : ग्रुप लाईफ टर्म इन्शुरन्स CTC च्या तीन पट रकमेप्रमाणे देण्यात येईल. तथापि, जर कर्मचाऱ्याचा CTC कमी असेल, तर किमान रु. 20 लाखांचे विमा कवच (Coverage) देण्यात येईल.
मेडिकल इन्शुरन्स : 5 लाख रुपये प्रति वर्ष (पती, पत्नी आणि तीन अपत्य) पॉलिसीनुसार देण्यात येईल.
वार्षिक फॅमिली डे / पिकनिक डे / स्पोर्ट डे : वर्षातून एकदा करण्याचे मान्य करण्यात आले.
कॅन्टीन : एकूण रकमेच्या 80% कंपनी पेड करणार आणि 20% कामगार पेड करणार असे मान्य करण्यात आले. कॅन्टीनमध्ये आठवड्यातून २ वेळा अंडे देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
फॅक्टरी इन्सेंटिव्ह : कंपनी पॉलिसीनुसार देण्यात येईल.
Department Social Lunch : वर्षातून २ वेळा विभागीय सामाजिक लंच आयोजित करण्याचे मान्य करण्यात आले आहे.
कंपनी उत्पादन (चॉकलेट गुढी बॅग) : प्रत्येक कर्मचाऱ्याला दर वर्षी १२ वेळा (दर महिन्याला एकदा) देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
आरोग्य आणि कल्याण उपक्रम : कंपनीच्या पायाभूत सुविधा (Infrastructure) विस्ताराच्या टप्प्यावर, फॅक्टरी परिसरामध्ये जिम सुविधा निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल.
शैक्षणिक सहाय्यता : कोणत्याही असोसिएटच्या मुलाने/मुलीने शैक्षणिक अथवा अभ्यासेतर (extra-curricular) क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केल्यास, कंपनीच्या वतीने प्रशस्तीपत्रक (Certificate) देण्यात येईल.
फॅक्टरी भेट : कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी दर २ वर्षांतून एकदा फॅक्टरीला भेट देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
करारावेळी कंपनी व्यवस्थापन यांच्यावतीने Rohit Sharma (Plant Manager), Sanghamitra Mukherjee (Lead AR Manager), Shashi Kant (AR Manager), Divanshu Kakkar (VSM), Sankaranarayanan Krishnan (Technical Manager) तसेच मार्स इंटरनॅशनल इंडिया एम्प्लॉईज युनियन यांच्या वतीने कमिटी मेंबर सागर थिटे (अध्यक्ष), प्रकाश वीर (जनरल सेक्रेटरी), विजयकुमार श्रीनाथ (उपाध्यक्ष), अजय पवार (सह सेक्रेटरी), अक्षय वाबळे (खजिनदार), दीपक चव्हाण आणि धनंजय मुलूक उपस्थित होते. हा करार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी Option Positive चे श्री अरविंद श्रोती यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
श्रमिक एकता महासंघ पुणे यांच्या वतीने अध्यक्ष किशोर सोमवंशी, जनरल सेक्रेटरी रोहित पवार, सल्लागार मारुती राव जगदाळे साहेब, यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तसेच इंटरनॅशनल युनियन ऑफ फूड फेडरेशन चे श्री प्रवीण खोतकर यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले.