नवी दिल्ली : डॉ मनसुख मांडविय यांनी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री म्हणून नवी दिल्लीत कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रीपदही आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा आणि मंत्रालयाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
मागील सरकारमध्ये डॉ मांडविय केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तसेच रसायने आणि खते मंत्री होते. डॉ.मांडविय यांनी गुजरातमधील पोरबंदरमधून लोकसभेची जागा जिंकली. यापूर्वी ते 2012 ते 2024 या कालावधीत राज्यसभेचे सदस्य होते. 2002-2007 दरम्यान ते पालितानातून गुजरात विधानसभेचे सदस्यही होते.
शोभा करंदलाजे यांनी श्रम आणि रोजगार राज्यमंत्रीपदाचा स्वीकारला कार्यभार
शोभा करंदलाजे यांनी नवी दिल्ली येथे श्रम आणि रोजगार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा देखील कार्यभार आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री होत्या.