नवी दिल्ली : एप्रिल 2024 मध्ये कर्मचारी राज्य विमा अर्थात ईएसआय योजनेशी 16.47 लाख नवीन कर्मचारी जोडले गेले आहेत. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (इएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीत ही माहिती दिली आहे.
एप्रिल 2024 मध्ये सुमारे 18,490 नवीन आस्थापनांचा समावेश ईएसआय योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेचा लाभ आता अधिक कामगारांना मिळेल.
देशातील युवकांसाठी अधिक रोजगार निर्मिती झाली आहे कारण या महिन्यात या योजनेशी जोडल्या गेलेल्या एकूण 16.47 लाख कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 47.60% म्हणजे 7.84 लाख कर्मचारी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत..
या महिन्यात 3.38 लाख महिला कामगारांची तर एकूण 53 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांची या योजनेअंतर्गत नोंदणी झाली आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे हे द्योतक आहे.
डेटा निर्मिती ही सतत होत असलेली प्रक्रिया असल्याने ही वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे.