मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ च्या कक्षेत येणाऱ्या सर्व आस्थापना (उदा. कारखाने, दुकाने व आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल्स, रेस्टोरेंट, बँका, हॉस्पिटल, मंडळे, महामंडळे, इ.) यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम १९५३ मधील कलम ६बब (२) मध्ये महाराष्ट्र अधिनियम क्र.२५ दि.१८.०३.२०२४ अन्वये सुधारणा झालेली आहे. त्यामुळे कामगार आणि मालक अंशदान दरात जून २०२४ पासून पुढीलप्रमाणे सुधारणा झाली आहे.
सहामाही अंशदान दर :
कामगारांचे अंशदान प्रती कामगार - रु.२५/-
मालकांचे अंशदान प्रती कामगार रु.- ७५/-
एकण रु.१००/-
उपरोक्त सुधारणेनुसार जून २०२४ पासून कामगार आणि मालक अंशदान public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधेद्वारे अदा करणे बंधनकारक आहे याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. अशी माहिती कामगार कल्याण मंडळ यांनी दिली आहे.