पुणे : येथील बकोरी ता.हवेली जि.पुणे औद्योगिक परिसरामधील नामांकित वैकफिल्ड फुड्स प्रायव्हेट लिमिटेड (Weikfield Foods Pvt Ltd) बकोरी पुणे कंपनी व्यवस्थापन व भारतीय कामगार सेना यांच्या वतीने येथील कायमस्वरूपी कामगारांसाठी पगार वाढीचा आणि अन्य सुविधांचा करार अतिशय मैत्रीपूर्ण व आनंदी वातावरणात दि.६ मार्च २०२४ रोजी उभयपक्षांमध्ये ९ वा त्रैवार्षिक वेतनवाढ करार उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. या नामांकित कंपनीत भारतीय कामगार सेना येथील सलग ३० वर्ष कष्टकरी कामगारांचे नेतृत्व करीत आहे.
या त्रैवार्षिक उभयपक्षी कराराचे वैशिष्ट्ये म्हणजे करार दि.९ जुलै २०२३ ते ३० जून २०२६ पर्यंत राहणार आहे. कंपनी व संघटनेचा सलग ९ वा वेतनवाढ करार असून, त्यात प्रत्यक्ष रुपये ७ हजार ९०० रुपयांची घसघशीत वाढ झाली असून इन्सेंटिव्ह २३७० रु.,३ लाख बफर मेडिक्लेम योजना, बोनस, प्रत्येक वर्षी कामगारांना २ युनिफॉर्म जोडी + १ जर्किंग + १ शुज जोडी + १ कॅप, सहल भत्ता, प्रत्येक कामगारास पेड हॉलिडे, मृत्यूफंड, कर्मचारी कुटुंबीय अंत्यविधि मदत इत्यादी सुविधा कामगारांना मिळणार आहे. तसेच करारामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश करुन कामगार हिताचा निर्णय घेतल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना नेते अध्यक्ष खा अरविंद सावंत कार्याध्यक्ष अजित दादा साळवी शिवसेना उपनेते, प्रदेश सरचिटणीस डॉ.रघुनाथजी कुचिक आणि कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने उभयपक्षी मुख्य संचालक वैकफिल्ड ग्रुप अश्विनीजी मल्होत्रा सी.ई.ओ., डि.एस.सचदेवा, सिनियर मॅनेजर,एच.आर. संजिव रंजन, योगेश सातव फायनान्स कंट्रोल बकोरी युनिट शैलेश खानोरे, अकाऊंट मॅनेजर, एच.आर.ओ.राहूल गावडे तसेच यूनिट कामगार प्रतिनिधी अध्यक्ष नामदेव मगर, उपाध्यक्ष संतोष सदाशिव वारघडे, सरचिटणीस संतोष रानबा वारघडे, सचिव उत्तम सातव, खजिनदार संजय बबन वारघडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
वेतनवाढ करार कामगार सेनेवर युनिट प्रतिनिधी व सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास, कंपनीतील सर्व कामगारांनी केलेले सकारात्मक काम राखलेला संयम, कंपनी व्यवस्थापनाचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, शिस्त या विश्वासाच्या बळावर करार यशस्वी, शांततामय वातावरणात संपन्न झाला.