पुणे : तळेगाव MIDC, पुणे येथील चासिस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स प्रा.लिमि. (Chasys Automotive Components Pvt. Ltd.) कंपनी व्यवस्थापन आणि चासिस ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स कामगार संघटना यांच्या मध्ये दि. ८ मार्च २०२४ रोजी वेतनवाढ करार १२ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुर्णतः आनंदी वातावरणात पार पडला. सदर करार पै. विश्वनाथ भेगडे जनरल व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष लहुमामा शेलार व सरचिटणीस शांताराम टकले यांच्या उपस्थितीत पार पडला.
कराराची ठळक वैशिष्ट्ये :
करार कालावधी : वेतनवाढ करार दि.१ एप्रिल २०२३ ते दि.३१ मार्च २०२६ पर्यंत राहील.
पगारवाढ : ३ वर्षांसाठी कामगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रु. १७००१ /- इतकी पगारवाढ मिळणार आहे.
फरक रक्कम : दि.१ एप्रिल २०२३ पासूनचा सर्व लागू झालेल्या सोई व सुविधांचा फरक देण्याचे मान्य केलं आहे.
महागाई भत्ता : प्रत्येक वर्षी जानेवारी व जुलै महिन्यात वर्षातून २ वेळा महाराष्ट्र शासन "इंजिनीरिंग इंडस्ट्री" साठी जाहीर केलेला भत्ता पगारात वाढ होणार आहे.
एल. टी. ए भत्ता : दर महिन्याच्या बेसिकचा १२ वा भाग
मेडिकल भत्ता : दर महिन्याच्या बेसिकचा १२ वा भाग
EL रजेमध्ये २ रजांनी वाढ करण्यात आली.
SL रजेमध्ये ३ रजांनी वाढ करण्यात आली.
CL रजेमध्ये १ रजांनी वाढ करण्यात आली.
PH मध्ये १ ने वाढ करण्यात आली.
बोनस : बेसिक व महागाई भत्ता (स्पे. अलाऊन्स) च्या ८.३३% व एक बेसिक सॅलरी, सरासरी रु.५५००० - ६०००० /- एवढा व रु.७५०/- किमतीचा ड्राय फ्रुट बॉक्स मिळणार आहे.
सुट्टीच्या दिवशी काम केल्यास ओव्हरटाईम दुप्पट तसेच १०००/- वेतनाच्या व्यतिरिक्त देण्याचे मान्य केले आहे.
कर्ज सुविधा : रु.१,६०,०००/- प्रत्येकी ४ कामगारांना विभागून दिले जातील व परतफेड ५ हप्यांमध्ये शून्य व्याजदारावर केली जाईल.
रजा साठवणूक : रजा साठवणूक ची मर्यादा ३० वरून वाढवुन ४५ केली आहे.
रात्रपाळी भत्ता : रात्र पाळी भत्ता ७०/- प्रति रात्रपाळी देण्याचे मान्य केले आहे.
सेवा ज्येष्ठता पुरस्कार : १२ वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना सेवा ज्येष्ठता पुरस्कार देण्याचे मान्य केले आहे.
फॅमिली प्रोग्रॅम : वर्षातून कोणत्याही सणाला फॅमिली प्रोग्राम करण्याचे मान्य केले आहे.
वैद्यकीय विमा : फॅमिली वैद्यकीय विमा २ लाख रुपये मध्ये स्वतः, पत्नी, २ अपत्य यांच्यासाठी लागू केला जाईल व (२ लाख रुपये बफर अमाउंट)
सांघिक टर्म विमा : कामगाराचा अकस्मात किंवा आजारपणामुळे/अपघाती मृत्यू झाल्यास कामगाराच्या वारसास १५ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे.
सांघिक अपघात विमा : रु.५ लाख विमा देण्याचे मान्य केले आहे.
करार यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या वतीने मॅन सु ली (MD), मिनसु किम (CFO), टे वू किम (DGM Plant Manager), सरावनन कलियुगा पांडियन (DGM Admin And Finance), निलेश माने (Sr. Manager Production), गुरुराज सावडी (Senior Manager Finance) तसेच संघटनेच्या वतीनेपदाधिकारी वैभव येवले, देवेंद्र बेंडाळे, धनंजय माळी, दिलीप साळुंके, श्रीकांत कोतकर यांनी प्रयत्न केले.
सदर करारासाठी टाटा मोटर्स एम्प्लॉयज युनियनचे कार्यक्षम कामगार नेते माननीय महेंद्रजी कदम यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले. तसेच ओग्नेबेनी इंडिया प्रा. ली. युनियनचे अध्यक्ष श्री. रघुनाथ गोरड व श्री. संतोष मोहिते व इतर पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.
संघटनेच्या सर्व कामगारांनी राखलेला संयम व दिलेले सहकार्य तसेच महत्त्वाचे म्हणजे संघटना व संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावर सभासदांचा असणारा अभूतपूर्व विश्वास व संघटनेच्या हितासाठी काहीही करण्याची तयारी व कंपनीचा कामगारांच्या कौशल्य, गुणवत्ता, शिस्त यावर पूर्ण विश्वास या सर्व बळावर करार संपन्न झाला.